सुनिल शेट्टीने लाँच केले मानसिक आरोग्य ॲप 'Lets Get Happi'

    03-Aug-2023
Total Views |
Suniel Shetty and Veda launch Let’s Get Happi
मुंबई: सध्या भारत आणि जगभरातील वाढत्या मानसिक आरोग्य समस्यांवरील चर्चेच्या पार्श्वभूमीवर वेदा रीहॅबिलिटेशन ॲन्ड वेलनेसतर्फे Letsgethappi ह्या जगातील पहिल्या मानसिक आरोग्य ॲपची सुरूवात करण्यात आली असून यात २४x७ मानसशास्त्रज्ञांतर्फे थेरपी उपलब्ध असेल. डिजिटल आरोग्य लॅन्डस्केपची पुनर्व्याख्या करणाऱ्या भारतातील स्टार्ट-अ प्समध्ये सखोल रूचि असलेल्या आणि मानसिक आरोग्य सेवा मोठ्‌या प्रमाणावर सर्वांसाठी उपलब्ध करून देण्यासाठी तसेच मानसिक आरोग्याविषयी असलेल्या सामाजिक मानसिकतेला दूर सारण्यासाठी समाधान प्रदान करण्यासाठी आरोग्यसेवा उद्योगातील अनेक उद्यमांमध्ये गुंतवणूक असलेले व्हेंचर कॅपिटालिस्ट आणि अभिनेता श्री.सुनिल शेट्टी यांनी वेदा रीहॅबिलिटेशन ॲन्ड वेलनेसचे संस्थापक आणि सीईओ श्री.मनून ठाकूर यांच्यासोबत आज मुंबईमध्ये Letsgethappi ह्या ॲपची सुरूवात केली. जेडब्लू मॅरिएट, जुहू येथे पार पडलेल्या ह्या सोहळ्‌यामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्रचे महासंचालक श्री.विश्वास नांग्रे पाटीलही उपस्थित होते.

वेदा रीहॅबिलिटेशन ॲन्ड वेलनेस ही भारतातील पहिली आणि एकमेव लक्झरी मेंटल हेल्थ ट्रीटमेंट सेंटर्सची श्रृंखला आहे. मुंबई, बेंगळुरू आणि नवी दिल्ली येथे सेंटर्स असलेल्या वेदामध्ये संपूर्ण मानसिक आरोग्य सेवा मिळते. मानसिक आरोग्यसेवेला किफायतशीर आणि सर्वांसाठी उपलब्ध करताना यात नावाबाबत गुप्तताही राखता येते. वेदाने भारतातील मेट्रो शहरांमधील खासकरून १६ ते ३५ वयोगटासाठी Lets get happi ॲप निर्माण केले आहे. हे ब्रॅन्ड्‌स खास आहेत कारण यात व्यक्तिगत आणि ऑनलाईन अशी दोन्ही प्रकारची थेरपी प्राप्त होते आणि त्यामुळे विभिन्न गरजा आणि बजेटनुसार सेवा मिळू शकते.क्रांतिकारी आणि अभिनव मानसिक आरोग्य ॲप Lets get happi हे जगातील पहिले ॲप आहे, ज्यात २४ तास मानसशास्त्रज्ञांकडून थेरपी मिळू शकते. यात ध्यान (काही हाऊस आणि ईलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिकवर आधारित आहेत), जर्नलिंग, असेसमेंट टेस्ट्‌सचाही समावेश आहे. हे जगातील एकमात्र मानसिक आरोग्य ॲप असून यात माफक दरात नावाबाबत गुप्तता राखण्याची सेवाही मिळते. ही अतिशय खास आणि आपल्या प्रकारची अशी एकमेव सेवा आहे.

Letsgethappi ॲप सुरू करण्यासाठी वेदाच्या श्री.मनून ठाकूरसोबत भागीदारी करण्याबद्दल श्री.सुनिल शेट्टी म्हणाले, “लोकांना मानसिक आरोग्य राखण्यासाठी साधने आणि ऑनलाईन थेरपी मिळवून देण्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. सध्या मानसिक आरोग्य समर्थन मिळवण्याच्या उपलब्धीमध्ये मोठी तूट असून Letsgethapp ह्या ॲपमध्ये सर्वसमावेशकतेचा खास मिलाफ आहे. येथे युजर्सना कुठल्याही भय किंवा व्यक्तीबद्दल कुठल्याही प्रकारचा तर्क केला न जाता निनावी समर्थन मिळवण्यासाठी सुरक्षित मार्ग प्रदान केला जातो. भारतात मानसिक आरोग्याच्या सामाजिक पैलूंच्या आकलनात आणि स्वीकृतीमध्ये अस्तित्त्वात असलेल्या तूटीला भरून काढण्यासाठी हे ॲप वचनबद्ध आहे.”“हे तंत्रज्ञान डिजिटल साधने आणि २४x७ मानवी समर्थन यांना एकत्र वापरते. युजर्सना स्वातंत्र्य देण्याचे यांचे ध्येय आहे. एखाद्याच्या शारीरिक आरोग्याप्रमाणेच त्यांच्या मानसिक आरोग्याला समर्थन देणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. Letsgethappi सर्वांगीण आरोग्यासाठी प्रोत्साहन देण्यावर आणि उद्योगातील सर्वोत्तम प्रॅक्टिसेसचा अवलंब करण्यावर भर देते.” असे श्री.सुनिल शेट्टी म्हणाले.


मानसिक आरोग्य समस्यांपासून त्रस्त असलेल्या लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी उत्सुक असलेले वेदाचे संस्थापक आणि सीईओ श्री.मनून ठाकूर म्हणाले, “भारतात मानसिक आरोग्य सेवा अधिकाधिक प्रमाणात उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही मोठी मेहनत घेत आहोत. इन–पेशंट उपचारांसाठी ऑफलाईन सेंटर्स आणि संपूर्ण सेवा प्रदान करण्यासाठी एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म आमच्याकडे आहे. मला आशा आहे की ही दयाळूपणा आणि सहानुभूतीवर आधारलेली पहिली अतिशय यशस्वी कंपनी बनेल.”मी स्वतः ही कंपनी शून्यापासून सुरू केली असून वेदामध्ये माझी गुंतवणूक सर्वांत जास्त आहे. मानसिक आरोग्याच्या समस्येसोबत मी स्वतः झगडण्याच्या माझ्या प्रवासाने मला विश्वासार्ह आणि प्रगत समाधान शोधण्यासाठी मला प्रेरणा मिळाली आणि त्यातूनच मी वेदाची सुरूवात केली. पुढील ३ वर्षांमध्ये यात सध्याच्या गुंतवणूकीवर आणखी रू.५५ करोडची गुंतवणूक केली जाणार असून त्याचा वापर कंपनीचा आवाका वाढवण्यासाठी आणि आणखी समाधान प्रदान करण्यासाठी केला जाईल.” असे श्री.ठाकूर म्हणाले.

ह्या ॲपमध्ये सध्या ऑडिओ, व्हिडीओ आणि चॅटच्या माध्यमातून थेरपी, जर्नलिंग, मानसशास्त्रीय मूल्यांकन चाचण्या, उद्योगातील तञ्ज्ञांकडून विभिन्न वेलनेस विषयांवर कॉन्टेन्ट, ओम जपासह ध्यान ते EDM आणि हाऊस म्युझिकवर आधारित ध्यान, दैनंदिन मूड चेक–इन यांचा समावेश असून ॲपचे व्हर्जन २.० मध्ये (२४ जानेवारी पर्यंत) AI ला फर्स्ट रिस्पॉन्डंटच्या रूपात आणत त्यासोबत आकलन आणि स्मरणशक्ती सुधारणारे गेम्स, प्रीमियम कॉन्टेन्ट, पॉडकास्ट्‌स आणि इंटरॅक्टिव्ह जर्नलिंगही आणले जाईल.ह्या ॲपला विभिन्न उद्योगांमधील अग्रगण्य मानसिक आरोग्य तञ्ज्ञांकडून समर्थन लाभले आहे. ह्या ॲपला अनेक एंजल गुंतवणूकदारांचे पाठबळ आहे. अभिनेता आणि उद्योजक श्री.सुनिल शेट्टी, सिलिकॉन व्हॅलीमधील सेलेब्रिटी शल्यविशारद आणि गुंतवणूकदार डॉ.श्रीनिवास रामचंद्र, स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमधील माजी प्राध्यापक डॉ.प्रमेला रामचंद्र, डायामॅंटिनाचे सीईओ श्री.योगेश बुलचंदानी, दुबईमधील प्रायव्हेट इक्विटीतील अमालथिआ कॅपिटलचे प्रणेते श्री.करण कुमार, लोटस हर्बल्सचे अध्यक्ष श्री.नितिन पास्सी इत्यादी नावाजलेल्या व्यक्तिमत्त्वांचे समर्थन ह्या ॲपला लाभले आहे. श्री. मनून ठाकूर यांची रिअल इस्टेट आणि इंफ्रा डेव्हलपमेंटची व्यावसायिक पार्श्वभूमी आहे, त्यांनी हार्वर्डमधून आंत्रेप्रेन्युअरशिप ॲन्ड लीडरशिपचा अभ्यास केला असून सध्या ते येल येथून मानसशास्त्रामध्ये एक कोर्स करत आहेत.

आयआयटी दिल्लीचे माजी विद्यार्थी राहिलेल्या श्री.सागर पाटीदार यांच्या NCR मधील प्रिमॅथॉन नावाच्या कंपनीने हे ॲप निर्माण केले आहे. Letsgethappi हे ॲप iOS आणि Android अशा दोहोंवर उपलब्ध असून याचे अगोदरच १६,००० डाऊनलोड्‌स झाले असून पुढील ९ महिन्यांमध्ये ५००,००० हून अधिक डाऊनलोड्‌स होण्याची अपेक्षा आहे. Letsgethappi हे ॲप डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंक्सवर क्लिक करा -

प्लेस्टोअरः https://play.google.com/store/apps/details?id=com.veda.happidoctor
ॲप स्टोअरः https://apps.apple.com/us/app/happi-doctor-२४-७-therapy/id६४४५९५८४४१

 
वेदा रीहॅबिलिटेशन आणि वेलनेसबद्दल माहितीः वेदा ही भारतातील पहिली आणि एकमेव लक्झरी मेंटल हेल्थ ट्रीटमेंट सेंटर्सची श्रृंखला आहे. मुंबई, बेंगळुरू आणि नवी दिल्ली येथे यांची सेंटर्स असून पुढील काही महिन्यांमध्ये आणखी ४ नवीन सेंटर्सची सुरूवात होणार आहे. नैराश्य, व्यसनाधीनता, क्लिनिकल चिंता आणि अन्य अनेक मानसिक आजारांनी ग्रासलेल्या रूग्णांवर येथे उपचार केले जातात. टॉक थेरेपिज, म्युझिक थेरेपि, आर्ट थेरेपि, साऊंड बाथ्स, गाईडेड मेडिटेशन प्रॅक्टिस, माईंडफूलनेस प्रॅक्टिस, गाईडेड योगा आणि अशाच अनेक उपचार पद्धतींचा येथे अवलंब केला जातो. एका वेळेस एका सेंटरमध्ये केवळ पाच क्लायंट्‌सना वेदामध्ये प्रवेश दिला जातो, त्यामुळे ही सुविधा ह्या क्लायंट्‌सकडे अगदी विशेष लक्ष देते. २ ऑगस्ट २०२३ रोजी वेदाने जगातील पहिले मेंटल हेल्थ ॲप Letsgethappi ची सुरूवात केली असून ह्या ॲपवर २४x७ ऑनलाईन थेरपी उपलब्ध आहे.



 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.