मुंबई : उद्धव ठाकरे म्हणजे कलानगरची बार्बी, अशी टीका भाजपा आ. नितेश राणेंनी केली आहे. खासदार संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंच्या घेतलेल्या मुलाखतीचा एक भाग आज दि. २६ जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी ठाकरेंनी सरकारवर टीका केली. ठाकरेंनी केलेल्या या टीकेनंतर आता भाजपाकडुन पलटवार केला जात आहे.
नितेश राणे म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचा सकाळी एपिसोड आला, मला वाटलं की ते कलानगरच्या बार्बीचा एपिसोड सुरु झाला. हे ट्रिपल इंजिन सरकार नाही अशी टीका त्यांनी केली, पण मग ते जे काय अडतीस काय छत्तीस नावाचे सगळे बंद पडलेले डबे एका मागे एक लावून पहिले पटनामध्ये फिरली नंतर आता बंगलोर मध्ये फिरले ते कुठले डबे आहेत आणि त्या डब्यामध्ये माल उरलाय का सगळे बंद पडलेले डबे एक दुसऱ्याला कोसळतायेत म्हणून दुसऱ्याला इंजिन आणि दुसऱ्याचे डब्बे मोजण्यामध्ये वेळ काढू नका. एकाला काय कामधंदा राहिला नाही. तो स्वतः विधानपरिषदेचा आमदार असताना पण हे असे मुलाखत देण्यापेक्षा तेवढाच काळ अगर त्यांनी विधानपरिषदेमध्ये बसून लोकांच्या समस्या ऐकल्या. लोकांच्या प्रश्न आम्हाला सरकार म्हणून विचारलं, तर त्यांच्या त्या आमदारकीला अजून महत्व येईल."
"म्हणून उगाच तुमच्याच पगारी नोकरला मुलाखत देण्यापेक्षा तो वेळ विधानपरिषदेमध्ये घालवा. आणि मग तिथे पाहिजे तर आमच्यावर टीका करा. मंत्र्यांवर आरोप करा, सरकारला धारेवर धरा. त्याला म्हणतात नेता. जनतेचा सेवक हे आपल्याच घरात बसून हा आपल्याच बेडरुममध्ये बसून आपलाच कामगार समोर बसवायचा. लाईट असे डीम करायची आणि समोरासमोर बसायचं. हे असे आंबट शौक म्हणतात याला. हे चांगले नाही आहेत. उद्धव ठाकरेंच्या मूळ स्वभावच काड्या लावण्याचा आहे ते काड्या लावण्याशिवाय ते किंवा त्यांचा तो कामगार त्यांचं पुरं दिवसच पूर्ण होत नाही." असं नितेश राणेंनी म्हटलं आहे.