ठाकरे, मविआच्या नादी लागू नका तुमचा बळी जाईल : प्रकाश आंबेडकर

    25-May-2023
Total Views |
 
Prakash Ambedkar
 
 
मुंबई : उध्दव ठाकरे मविआच्या नादी लागू नका, तुमचा बळी जाईल. असा सुचक इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. आम्हाला घेतल्याशिवाय सत्तेत जाता येणार नाही. वंचितशिवाय कुणाचीही सत्ता येणार नाही. असा अप्रत्यक्ष टोला ठाकरेंना लगावला आहे. २४ मे रोजी भांडुपमध्ये वंचित बहुजन आघाडीची जाहीर सभा झाली. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी विविध राजकीय मुद्द्यांवर आपली रोखठोक भूमिका मांडली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंना सावध राहण्याचा सल्लाही दिला आहे.
 
महाविकास आघाडीच्या नादी लागू नका, अन्यथा तुमचा राजकीय बळी जाईल. आम्ही शिवसेनेबरोबर जाणार हे आम्ही त्यावेळीच जाहीर केले आहे. त्यांचा प्रयत्न आहे की यात राष्ट्रवादी आणि काँग्रेसनेही सोबत यावे. त्यासंदर्भात मी म्हटलं की नाना पटोलेंच्या वक्तव्याकडे लक्ष द्या. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थिती पाहून ताबडतोब ठाकरे गटाने निर्णय घेतला तर अधिक चांगले आहे, असा सल्लाही प्रकाश आंबेडकरांनी उद्धव ठाकरेंना दिला.
 
प्रकाश आंबेडकरांनी यावेळी ईडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या नेतेमंडळींची होत असलेली चौकशी यावर ते म्हणाले, "राष्ट्रवादीत जयंत पाटलांप्रमाणेच अनेक जणांना जर अल्टिमेटम दिला की ‘आम्ही एकतर तुम्हाला अटक करू किंवा तुम्ही भाजपमध्ये प्रवेश करा’, तर ते भाजपमध्ये जाण्यासाठी कधीही इच्छुक असतील. ते तुरुंगात जाण्यास इच्छुक नसतील. त्यामुळे सध्याच्या ईडीच्या राजकारणात इथला सगळ्यात कमकुवत राजकीय पक्ष कोणता असेल, तर तो राष्ट्रवादी काँग्रेस आहे." असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.