आता आदित्य ठाकरेंनी सरपंच तरी होऊन दाखवावं!

- आ. नितेश राणे यांचा हल्लाबोल

    23-May-2023
Total Views |
 
Nitesh Rane
 
 
मुंबई : महाविकास आघाडीपासून आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री होण्याची घाई आहे. उद्धव ठाकरे हॉस्पिटलमध्ये असताना मुख्यमंत्री होण्याचे आदित्य ठाकरेंचे स्वप्न आहे. मात्र सद्यस्थितीला शिल्लक सेनेत आदित्य ठाकरे सरपंच तरी होईल का? असा खरमरीत सवाल आ. नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे. एकीकडे काँगेसचे पृथ्वीराज चव्हाण सांगत आहेत की, ठाकरे सेना तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे, मग आदित्य ठाकरे सरपंच तरी होतील का? असा घणाघात राणे यांनी केला आहे.
 
राजधानी दिल्लीत उभारण्यात येत असलेल्या नवीन संसद भवनाच्या इमारतीवरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकावर निशाणा साधला आहे. तसेच, लोकशाहीला संपवण्याचं काम सुरु असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. यावर आमदार नितेश राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी नितेश राणे म्हणाले की, "संजय राऊत टेबल पत्रकार असून त्यांना नवीन संसद भवनाबाबत किती माहिती आहे, याची मला शंका आहे. नवीन संसद इमारतीला तेव्हाच सगळ्यांनी मान्यता दिली आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांना उद्देशून नवीन मातोश्री का बांधली? नवीन संसद भवन म्हणजे देशासाठी नवीन इमारत बांधली आहे. अडीच वर्षाच्या काळात बाळासाहेबांचे स्मारक तरी बांधू शकले का? बाळासाहेबांनी सांगितलं आहे की, काँग्रेस समोर झुकणारे हिजडे असतात. मग आता हे काय करतात?" अशी घणाघाती टीका राणे यांनी यावेळी केली.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.