अमृता फडणवीस फसवणूक प्रकरणी डिझायनर अनिक्षा ताब्यात घरावर छापेमारी

    16-Mar-2023
Total Views |

designer-aniksha-detained-in-amruta-fadnavis-fraud-case


मुंबई
: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना धमकी आणि लाच देण्याच्या प्रकरणात डिझायनर अनिक्षा हिला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच वडील बुकी अनिल जससिंघानी यांच्या घरावर छापे टाकण्यात आले आहेत. अनिक्षाला उल्हासनगर येथील घरातून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
 
अमृता फडणवीस यांनी एका डिझायनर विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्या डिझायरने अमृता फडणवीसांना १ कोटींची लाच ऑफर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यांच्या तक्रारीनंतर मलबार हिल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखला करण्यात आला त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

एका गुन्ह्यात मदत करण्याची मागणी करत चुकींची माहिती देऊन तब्बल १ कोटी तुम्हाला देऊ अशी ऑफर अमृता फडणवीस यांना आरोपी महिलेने आणि तिच्या वडिलांनी केली होती.
 
या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे की, १८ आणि १९ फेब्रुवारीला अनिक्षाने तिच्या व्हिडिओ क्लिप, व्हॉईस नोट्स आणि अनेक मेसेज एका अज्ञात फोन नंबरवरुन पाठवण्यात आले. तसेच ती डीझायनर धमकावण्याचा प्रयत्न करत होती, असेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.