छत्तीसगड काँग्रेस सरकारने महादेवाचे नावही सोडले नाही! पंतप्रधान मोदींचा घणाघात

    04-Nov-2023
Total Views | 123

Narendra Modi


रायपूर :
काँग्रेस नेते आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी महादेव ॲप प्रवर्तकांकडून ५०८ कोटी रुपये घेतल्याचा आरोप ईडीकडून करण्यात आला होता. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूपेश बघेल यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवार, ४ नोव्हेंबर रोजी छत्तीसगडमधील दुर्ग येथे निवडणूक रॅलीला संबोधित केले. यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, भाजपचा रेकॉर्ड असा आहे की, ते जे काही बोलतात ते करून दाखवतात. यावेळी काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा हा खोटारडेपणाचा असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
 
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, छत्तीसगडच्या काँग्रेस सरकारने तर महादेवाचे नावही सोडलेले नाही. हा पैसा सट्टेबाज आणि जुगारांचा असून तो त्यांनी छत्तीसगडमधील गरीब आणि तरुणांना लुटून जमा केला आहे, असे ते म्हणाले. काँग्रेस नेते या लुटलेल्या पैशातून आपली घरे भरत आहेत, असेही ते म्हणाले. महादेव' बेटिंग ॲपच्या लोकांशी भूपेश बघेलचे काय संबंध आहेत? असा सवाल पंतप्रधान मोदींनी यावेळी केला. तसेच पैसे जप्त केल्यानंतर छत्तीसगडचे मुख्यमंत्री घाबरुन गेले आहेत, असेही ते म्हणाले.
 
पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज संपूर्ण छत्तीसगड 'भाजप इज बॅक' आणि 'अबकी बार भाजपा सरकार'चा नारा देत आहे. भाजपने जारी केलेल्या ठराव पत्राबद्दल त्यांनी कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. या संकल्प पत्रात छत्तीसगडच्या माता-भगिनी, येथील तरुण आणि शेतकरी यांना सर्वाधिक प्राधान्य देण्यात आले असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच काँग्रेसला भ्रष्टाचारातूनच तिजोरी भरायची असल्याचेही ते म्हणाले.



अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121