जयपूर : रोग्यांना बरे करण्याच्या नावाखाली चमत्काराचे खेळ दाखवून खुलेआम धर्मांतरणाचा खेळ राजस्थानमध्ये सुरू आहे. धक्कादायक बाब म्हणजे या सर्व गोष्टींच्या प्रसारासाठी इन्स्टाग्राम रिल्सचा वापर केला जात आहे. राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये स्थित एका 'चमत्कार चर्च ऑफ जिजस' या जागेवर हा सर्व प्रकार सुरू आहे. सोशल मीडियाद्वारे पीडित रुग्णांना आकर्षित करुन त्यांना धर्मांतरणाला बळी पाडले जात असल्याचा आरोप या चर्चवर करण्यात आले आहे. धर्मांतरणाच्या व उपचाराच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचे शोषण केले जात असल्याचीही तक्रार अनेक सोशल मीडिया युझर्ननी दिली आहे.
इंस्टाग्रामवर 'चमत्कार चर्च' नावाच्या या अकाऊंटचे ६१ हजार फॉलोअर्स आहेत. या अकाउंटवर अंधश्रद्धा पसरवणारे असंख्य व्हीडिओ अपलोड केलेले आहेत. यातील बऱ्याच व्हीडिओत मुलींचे मानसिक शोषण केले जात आहे. यात पादरी मुलींच्या डोक्यावर हात ठेवतो. त्यानंतर अचानक त्या मुली वेड्यासारख्या सैरभेर धावताना दिसत आहेत. या सर्व खोट्या अंधश्रद्धा दाखवून आणि अशा प्रकारच्या रिल्स पसरवून मोठ्या प्रमाणात दलित हिंदूंसोबत धर्मांतराचा खेळ सुरू असा आरोप करण्यात आला आहे.
दरम्यान, अशा प्रकारची अंधश्रद्धा पसरवणारी ठिकाणे बंद करण्याची विनंती केंद्र सरकारकडे करण्यात येत आहे. केंद्र सरकारने योग्य ती कारवाई करून धर्मातर करण्यास प्रवृत्त करणाऱ्या ठिकाणांवर बंदी आणण्याचे आवाहन अनेकांकडून करण्यात येत आहे. ट्विटर युझर शुभांगी पंडित यांनी याविरोधात आवाज उठवला आहे.
Missionary gangs are mentally exploiting minor girls in the name of miracles.
This account named "Chamtkaar Church" on Instagram has 61k followers and hundreds of videos are full of similar superstitions where minor girls are being mentally exploited.
त्या म्हणतात, "मिशनरी गँग्स अल्पवयीन मुलींचे शोषण करुन चमत्काराच्या नावाखाली त्यांचे धर्मांतरण करत आहेत. चमत्कार चर्च या अकांऊट्सवर एकूण ६१ हजार फॉलोअर्स आहेत. या अकाऊंटवरील प्रत्येक व्हीडिओत मुलींचा मानसिक ताबा घेऊन त्यांना धर्मांतरणाला आणि अंधश्रद्धा मानण्याला भरीस पाडलं जात आहे. दलित हिंदूंच्या अज्ञानाचा फायदा घेत त्यांनी हा खेळ चालवला आहे. जगात ख्रिश्चन धर्म सर्वदूर पसरला आहे मात्र, भारत वगळता अन्य कुठल्याही देशात असे हिडीस प्रकार चालत नाहीत."
"सरकारला या सर्वांविरोधात कारवाई करण्यापासून कुणी रोखले आहे. हे प्रकार आपल्या देशात का सुरू आहेत? राजस्थानच्या काँग्रेसी सरकारकडून यात कुठल्याही प्रकारची कारवाईची अपेक्षाच नाही मात्र, केंद्र सरकारने तातडीने याची दखल घेऊन कायदेशीर कारवाई करावी. भारतातील विद्यार्थी, लहान मुलं ही शिक्षणाने शहाणी झाली पाहिजेत, अशा धर्मांतरणाच्या सापळ्यात अडकल्यावर त्यांच्या भविष्याचे काय होणार," असा सवाल त्यांनी विचारला आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.