चीनच्या विस्तारवादाला टक्कर देण्यासाठी अदानी समूह आणि अमेरिका एकत्र!

    13-Nov-2023
Total Views |
 ADANIPORTS
 
मुंबई : अदानी समूहाच्या अदानी पोर्ट्स या कंपनीला अमेरिकेकडून मोठा निधी मिळाला आहे. श्रीलंकेतील कोलंबो बंदराच्या टर्मिनल विकासासाठी अमेरिकेच्या सरकारकडून ५३३ दशलक्ष डॉलर्सचे कर्ज दिले आहे. या कर्जातून मिळालेल्या निधीमुळे अदानी पोर्ट्सला आपला व्यवसायाचा विस्तार करण्यास मदत होणार आहे.
 
कोलंबोमधील अदानी पोर्ट्सची भागीदारी असलेल्या टर्मिनलला अमेरिका सरकार यूएस इंटरनॅशनल डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशनच्या माध्यमातून निधी देत आहे. यासह परदेशात अदानीच्या बंदर व्यवसायाच्या विस्तारामुळे हिंद महासागरातील चीनच्या वर्चस्वावरही परिणाम होणार असून, व्यवसायासाठी जागतिक स्तरावर अदानी पोर्ट्स ही कंपनी चीनला टक्कर देऊ शकते.
 
अदानी पोर्ट्स ही भारतातील सर्वात मोठी पोर्ट ऑपरेटर आहे. अदानी पोर्ट्स देशांतर्गत १४ टर्मिनल्स ऑपरेट करत आहे. त्यासोबतच कंपनीकडे इस्रायलचे हायफा आणि श्रीलंकेतील कोलंबो पोर्ट ऑपरेट करत आहे. त्याचबरोबर अदानी पोर्ट जगभरातील इतर देशांमध्ये सुद्धा विस्तार करण्यासाठी पावलं टाकत आहे.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.