सुरेश खाडे कुठेही पिक्चरमध्ये नव्हते पण आता कॅबिनेट मंत्री बनलेत!

    09-Aug-2022
Total Views |

sk
 


मुंबई:
मिरज विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार सुरेश खाडे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. आमदार डॉ. सुरेश दगडू खाडे यांनी वेल्डिंग डिप्लोमा असे शिक्षण करत कोलंबो युनिव्हरसिटी येथून डॉक्टरची पदवी मिळवली.
 
सुरेश खाडे हे २००४ साली पहिल्यांदा निवडून आल्यानंतर मिरज मतदारसंघातून २००९, २०१४ आणि २०१९ असे सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून येत त्यांनी विधानसभा गाठली. २०१९ मध्ये भाजपा-सेना युती सरकारमध्ये त्यांनी चार महिन्यांसाठी समाजिक न्यायमंत्री म्हणून काम पाहिले आहे.
 
भाजपचा जिल्ह्यातील दलित चेहरा,अशी त्यांची ओळख आहे. दुष्काळाच्या प्रश्नावर सुरेश खाडे यांनी विधानसभेत अनेकवेळा आवाज उठवला आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाकडून पहिल्यांदा निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांचा पराभव झाला होता. मात्र, फडणवीस शिंदे सरकारमध्ये त्यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळालं आहे. 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.