ठाकरे सरकारतर्फे राज ठाकरेंच्या सुरक्षेत वाढ!

    दिनांक  13-May-2022 19:15:43
|
 
 
 
 
raj
 
 
 
 
 
मुंबई : मशिदींवरील बेकायदा भोंग्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतल्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची भेट घेतली होती. त्यांनी राज ठाकरेंची सुरक्षा वाढवण्याची मागणी केली होती. भोंग्यांच्या वादावरुन राज ठाकरेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पत्राद्वारे हल्लाबोल केला.
 
 
 
ते म्हणाले, "राज्य सरकार ज्या प्रकारे माझ्या कार्यकर्त्यांवर पोलीस बळाचा वापर करत आहे. राज्यातील शस्त्रास्त्रसाठा आणि दहशतवादी शोधण्यासाठी झाला आहे का? पक्षाचे कार्यकर्ते केवळ भोंग्यांवरील न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करत आहेत. मुंबई पोलीस मनसे कार्यकर्ता संदीप देशपांडे यांचाही शोध घेत आहे.
 
 
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.