तुमच्या स्वार्थासाठी सर्वसामान्यांना वेठीस धरू नका !

धारावीतील सकीनाबाई चाळीतील नागरिक मुंबई महानगरपालिकेविरोधात जन आक्रोश

Total Views |

dharavi
मुंबई:
धारावीतील सकीनाबाई चाळीतील रहिवाशी पुनर्बांधणीसाठी पाडण्यात आलेले शौचालय लवकरात लवकर बांधण्यात यावे याकरिता आक्रमक झाले आहेत. तसेच पालिकेने हा विषय गंभीरतेने न घेतल्यास लवकरच आम्ही सर्व चाळीतील रहिवाशी मुंबई महानगरपालिकेवर आंदोलन करणार असल्याचा इशाराच या नागरिकांनी पालिकेला दै. मुंबई तरुण भारतशी बोलताना दिला आहे.
ऑगस्ट महिन्यात या चाळीतील शौचालय पुनर्बांधणीसाठी पाडण्यात आले. त्याठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात ४ शौचालयांची उभारणीही करण्यात आली. मात्र मागील तीन महिन्यांपासून तेही बंद अवस्थेत आहेत. चाळीतील आणि आजूबाजूच्या परिसरातील हजारो नागरिकांची यामुळे गैरसोय होतेय. यामध्ये ज्येष्ठ नागरिक, महिला आणि तरुणींना दूरवर असणाऱ्या शौचालयात जावे लागतेय. सहा महिने झाले शौचालय बंद आहेत. कुठेतरी आधार घेत घेत चालत जावं लागत. चालायला जमत नाही मला तरीही काहीच पर्याय नाही. तिथेही एकावेळी ५ रुपये इतकी रक्कम घेतली जातात, अशी व्यथा एका ज्येष्ठ महिलेने मांडली.
आधीच्या शौचालायची दुरवस्था झालेली होती. त्याचाही त्रास होयचा म्हणून आम्ही हे बांधून द्यावं मागणी केली. मात्र जुनं शौचालय पडून नगरसेवक रेश्मा बानू यांच्याशी बोलून, पत्रव्यवहार करून हे शौचालय बांधून द्यावं ही मागणी केली. अर्ज केल्यानंतर त्यांनी आमच्या मागणीला दादही दिली. आम्ही ऑगस्ट महिन्यात या कामाचे भूमिपूजन केले.महापालिकेने जानेवारी महिना ही डेडलाईन ठरवली होती. मात्र इथल्या काही स्थानिकांनी यात खोट घालत चाळ मालकाची चुकीची माहिती देऊन दिशाभूल करत या कामावर स्टे आणला. मात्र आम्ही सर्वानी चाळ मालकाशी संपर्क साधून त्यांना योग्य माहिती दिली. आता आम्ही महापालिकेतील अधिकारी आणि मालक यांच्यात समन्वय साधून हा न्यायालयातून हा स्टे कसा उठवता येईल यावर विचारविमर्श केला आहे. आता चाळमालकांचाही गैसमज दूर झाला असून लवकरच ही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होऊन हे काम पूर्ण होईल अशी आशा आहे. मात्र पालिकेकडे आमची एवढीच मागणी आहे आणि या कामात खोड घालणार्यांनाही की तुम्ही राजकारणासाठी इथल्या नागरिकांची गैरसोय करू नका. नागरिक खरंच त्रासले आहेत नाहीतर तर आता स्थानिक पालिकेवर आंदोलन करतील. तुमच्या स्वार्थासाठी आमच्या आई-बहिणींना, आई-वडिलांना, सर्वसामान्यांना वेठीस धरू नका.

- विशाल कारंडे, स्थानिक नागरिक


सहा महिने झाले हे शौचालय पडून अद्याप बांधकाम पूर्ण झाले नाही. त्यामुळे आम्हाला आता पैसे देऊन बाहेर लांब जावं लागत. यामुळे स्थानिकांना खूप त्रास होतोय. अंक ज्येष्ठ नागरिक आहेत ज्यांना चालत नयेत नाही. त्यांची गैरसोय होते. काही अपघात झाला कोणाचा तर भरपाई कोण देणार?
- उमेश सोनावणे, स्थानिक नागरिक
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहमदनगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूटमधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयातून पदव्युत्तर शिक्षण. सध्या मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर कार्यरत.