ऊर्जा देणारी असून निसर्गाचे लाभलेले वरदान आहे. देवदेवतांच्या पूजाअर्चनेसाठी, जपतप करण्यासाठी घोंगडीचा प्राचीन काळापासून वापर होतो. भगवान श्रीकृष्ण, भगवान श्री दत्त, श्री नवनाथ, श्री पांडुरंगासह अनेक देवादिकांच्या आवडीचे वस्त्र म्हणजे घोंगडी होय.
हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चनसह जगाच्या पाठीवर असलेल्या सर्व जातीधर्म व पंथात घोंगडीच्या आसनास मान्यता आहे. अर्थात घोंगडीचा निर्माता हा धनगर पशुपालक असून त्याच्या घोगंडीला किती मोठा सन्मान आणि लौकिक प्राप्त झाला आहे, हे आपल्याला माहिती झाले.घोंगडी ही उबदार असून घोंगडी वापरण्याचे अनेक फायदे आहेत. शरीराला फायदेशीर ठरणारी घोंगडी पूर्वी प्रत्येकाच्या घरात होती. पित्त, वाताच्या त्रासात घोंगडीचा वापर होत असे, तर अंगदुखी, पाठदुखी, मणक्याचा त्रास असलेल्या लोकांना घोंगडी वापरण्याचा सल्ला आजही देण्यात येतो. हिवाळ्यात थंडीपासून संरक्षण करण्यासाठी आपण उबदार वस्र म्हणून घोंगडीचा वापर करतो.
घोंगडी सहज तयार होत नाही. फार किचकट प्रक्रियेतून घोंगडी तयार होते. पूर्वी लोक पारंपरिक व्यवसाय म्हणून हातमागावर घोंगडीचे विणकाम करीत असे. भारतात आलेल्या इंग्रजांना या घोंगडीची उब इतकी भावली की त्यांनी हजारो घोंगड्या मायदेशी पाठवून दिल्या होत्या, अशी एक मालिका ‘मालगुडी’ नावाने पाहायला मिळते.शेवटी अनुभव हीच खात्री असते. एखाद्या वस्तूच्या विक्रीकरिता जाहिरात विश्वात ब्रॅ्रण्ड अॅम्बेसिडर नेमून तिची ब्रॅ्रण्डिंग केली जाते. लोकांना जाहिरातींद्वारे आकर्षित केले जाते.
मात्र, घोंगडी ही कोणत्याही ब्रॅ्रण्ड अॅम्बेसिडरची गरज नसलेली व लोकमान्यता असलेली लोकवैभवाची, भारतीय संस्कृतीची ओळख टिकवून ठेवणारी वस्तू आहे.शिवाय घोंगडीचा ब्रॅ्रण्ड आणि ब्रॅ्रण्ड अॅम्बेसिडर देवादिकांसह साधुसंत, महात्मे व थोर पुरुष आहेत. सध्या यांच्यापेक्षा कुणीही मोठे नाही.व्यायाम करण्यासाठी, योग, प्राणायाम करण्यासाठी, बैठकीसाठी, झोपण्यासाठी, अथंरुण-पाघंरुण घेण्यासाठी, सोवळ्यात नेसण्यासाठी घोंगडीचा वापर होतो. काळी घोंगडी, पांढरी घोंगडी, खळाची घोंगडी, लोकरीची घोंगडी यामध्ये हातमागावर विणलेली तसेच मशीनवर तयार केलेली घोंगडी आज बाजारपेठेत उपलब्ध आहेत. घोंगडी तयार करण्यासाठी वेळ व परिश्रम तसेच कल्पकतेचा वापर होतो.
कौशल्यपूर्ण असल्याने घोंगडीची किमंत ब्रॅ्रण्डिंगच्या या विश्वात तशी जेमतेम आहे. शिवाय घोंगडीची ‘वॉरेण्टी’ आणि ‘गॅरेण्टी’ ‘लाईफटाईम’ असते. ती कधीही खराब होत नसल्याने मेन्टेनन्सचा खर्च नाही. बहुतेक वेळा लोक पांघरण्यासाठी रेघजिन्सचा वापर करतात. पण, कालांतराने ते खराब होतात. मात्र, घोंगडी कधीही खराब होत नाही. धुवून काढली, वाळू घातली की पुन्हा वापरता येते.
पावसाळ्यात ‘घोंगटे’ म्हणून वापर केली जाते अशीही घोंगडी शिवकाळात मावळ्यांच्या खांद्यावर नेहमीच असायची. दर्याखोर्यांत राहणार्या लोकांकडे आजही घोंगडी पाहायला मिळते. त्यामुळे आपणही घोंगडी वापरायला हरकत नाही. सध्या चंपाषष्ठी उत्सव राज्यभर सुरू असून, हे लोक उत्सवात तळी भरण्यासाठी खास घोंगडीचा वापर होतो. यास धार्मिक जोड असून हिंदू धर्माच्या सणउत्सवाला जोडून ठेवणारी मराठमोळी उबदार घोंगडी बदलत्या काळातही आपले अस्तित्व टिकवून आहे.
-रामभाऊ लांडे
(लेखक इतिहास संशोधक आहेत.)