दसऱ्यादिवशी आयपीएल २०२१चा सुपर धमाका

    दिनांक  07-Jun-2021 17:12:57
|

IPL_1  H x W: 0
 
नवी दिल्ली : आयपीएल २०२१चे उर्वरित सामने सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात होणार असे समजल्यानंतर आता क्रीडाप्रेमी या स्पर्धेची वात पाहत आहेत. आयपीएल २०२१मध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याने स्पर्धा अर्ध्यातच थांबवण्यात आली होती. त्यानंतर आता उर्वरित ३१ सामने हे युएईमध्ये होणार असल्याचे बीसीसीआयने घोषित केले आहे. यावर आता आणखी एक मोठी बातमी म्हणजे स्पर्धेचा अंतिम सामना हा १५ ऑक्टोबरला म्हणजेच दसऱ्यादिवशी होणार आहे.
 
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, बीसीसीआय आणि संयुक्त अरब अमिरीती सरकारमध्ये स्पर्धेबाबत सकारात्मक चर्चा सुरु आहे. त्यामुळे आयपीएलचे हे पर्व यशस्वी होईल अशी आशा बीसीसीआयला आहे. तसेच, आयपीएलचे उर्वरित ३१ सामने हे २५ दिवसांत संपेल. म्हणजेच ही स्पर्धा १९ सप्टेंबरला चालू होऊन १५ ऑक्टोबरला म्हणजेच दसऱ्यादिवशी अंतिम सामना होईल, असे सांगण्यात येत आहे. याबाबत अधिकृत घोषणा जरी झाली नसली, तरी बीसीसीआय सर्व तपशीलसोबत लवकरच घोषणा करेल, असे सांगितले जात आहे.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.