रोजंदारी कामगार झाली आमदार !

    दिनांक  03-May-2021 15:48:44
|
cbb_1  H x W: 0


दिनदयाल उपाध्याय यांची ‘अंत्योदया’ची संकल्पना प्रत्यक्षात आली आहे
 
 
 
नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : समाजातील अगदी दुर्बल घटकाला मुख्य प्रवाहात आणण्याचे स्वप्न राष्ट्रवादी तत्वचिंतक पं. दिनदयाल उपाध्याय यांनी पाहिले होते. त्या विचारावर वाटचाल करणाऱ्या भाजपने पश्चिम बंगालमध्ये चंदना बाउरी यांना विधानसभेची उमेदवारी दिली आणि अगदी कालपर्यंत रोजंदारीवर काम करणाऱ्या चंदना आज बंगाल विधानसभेत पोहोचल्या आहेत.
 
 
 
प. बंगालमध्ये पुन्हा एकदा ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने दणदणीत विजय मिळविला आहे. त्याचवेळी ममता बॅनर्जी यांच्यावर पराभवाची नामुष्की आली. भाजपने सर्व शक्तिनीशी प्रचार करूनही अपेक्षित यश मिळाले नाही, त्यामुळे ममतांचे कौशल्य मान्य करावेच लागेल.
 
 
 
त्याचवेळी भाजपच्या चंदना बाउरी या रोजंदारीवर काम करणाऱ्या महिलेचा विजय दुर्लक्षित करूच चालणार नाही. कारण, तृणमूल काँग्रेसच्या हिंसेच्या राजकारणाला झुगारून ते चंदना यांना विजय मिळाला आहे. चंदना बाउरी यांना भाजपने उमेदवारी दिली तेव्हा त्याकडे प्रस्थापितांनी अजिबातच लक्ष दिले नाही. एवढेच नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचारसभेत त्यांचा उल्लेख केला, त्याकडेही कोणाचे लक्ष नव्हते. मात्र, सालतोरा विधानसभा मतदारसंघामध्ये चंदना या अतिशय शांतपणे आपला प्रचार करीत होता. सोबतीला भाजपचे कार्यकर्ते होतेच, मात्र चंदना यांना राजकारणाची कोणतीही पार्श्वभूमी नव्हती. त्यामुळे सालतोरा मतदारसंघाचा निकाल हाती येईपर्यंत चंदना कोणाच्या खिजगणतीतही नव्हत्या.
 
 
 
मात्र, सालतोरा मतदारसंघाचा निकाल जाहिर झाला आणि त्यामध्ये चंदना बाउरी यांना तब्बल ९१ हजार ०३२ मते मिळून त्या विजयी झाल्या. त्यांनी तृणमूल काँग्रेसचे उमेदवार संतोष कुमार मंडल यांचा ४ हजार २१८ मतांची पराभव केला. मंडल यांना ८६ हजार ८१४ मते मिळाली तर माकपचे नंदुलाल बाउरी यांना केवळ १३ हजार ९८२ मते मिळाली.
 
 
 
चंदना यांचा विजय हा काही अचानक मिळालेला नाही. त्या २०१४ सालापासून भाजपच्या कार्यकर्त्या म्हणून काम करीत आहेत. सर्वप्रथम २०१८ साली बंगालच्या पंचायत निवडणुकीत विजय मिळवून त्या ग्राम पंचायत सदस्य झाल्या होत्या. त्यांच्या या विजयाचे वैशिष्ट्य म्हणजे तृणमूल काँग्रेसने पंचायत निवडणुकीत अभुतपूर्व हिंसाचार घडविला होता, तरीदेखील चंदना विजयी झाल्या होत्या. त्यानंतर २०१९ साली त्या बांकुरा जिल्हा समितीच्या सदस्यही झाल्या होत्या. भाजपने आपणास दिलेल्या सन्मानामुळे आणि दाखविलेल्या विश्वासामुळेच विधानसभा निवडणुकीत विजय मिळाल्याचे त्या सांगतात.
 
 
  

cb_1  H x W: 0  
 
 
झोपडी ते विधानसभा...
 
 
 
चंदना बाउरी या अतिशय सर्वसामान्य कुटुंबातील आहेत, त्यांना ३ मुलेही आहेत. त्यांचे पती श्रवण बाउरी हे रोजंदारीवर काम करतात, घर चालविण्यासाठी मदत व्हावी म्हणून अनेकदा चंदनादेखील पतीसोबत रोजंदारीवर मिळेल ते काम करतात. त्यांचे घर म्हणजे केवळ मातीची झोपडी, मात्र तरीदेखील लढा देण्याचा त्यांचा स्वभाव आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांनी दिलेली संपत्तीची माहिती म्हणजे बँक खात्यात ६ हजार ३३५ रुपये, पतीच्या बँक खात्यात १ हजार ५६१ रुपये, चंदना यांची एकुणच अचल संपत्ती आहे ३१ हजार ९८५ रूपये तर पती श्रवण यांची अचल संपत्ती आहे ३० हजार ३११ रूपये. सोबतच ३ बकऱ्या आणि ३ गायी. मात्र, जिद्दीने विजय मिळवून त्या आता विधानसभेत पोहोचल्या आहेत.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.