पत्रकारांचे लसीकरण करणे गरजेचे : भुजबळ

    10-May-2021
Total Views | 109
cga_1  H x W: 0 

 
राज्यातील पत्रकारांना तातडीने लस देण्यात यावी मंत्री छगन भुजबळ यांची मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे मागणी




नाशिक : 
राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी १५ मे पर्यंत कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. यासोबतच राज्यातील सर्व नागरिकांच्या संपूर्ण लसीकरणावरही राज्य सरकार आणि आणि केंद्र सरकारकडून भर दिला जात आहे. आपण ज्या पद्धतीने सर्व आरोग्य कर्मचारी, पोलीस कर्मचारी, सफाई कर्मचारी, आरोग्य सेवक यांना प्राधान्यांने लस दिली आहे. त्याच पद्धतीने राज्यातील प्रत्येक घडामोडी जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी कष्ट घेणाऱ्या पत्रकारांना देखील लस देण्यात यावी अशी मागणी आज राज्याचे 'अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री 'छगन भुजबळ यांनी पत्र पाठवून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे.
 
 
 
मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच विविध वृत्तपत्रांचे पत्रकार, वृत्तवाहिन्यांचे वार्ताहर व प्रतिनिधी हे देखील बातम्यांच्या शोधात संपुर्ण राज्यभर फिरत असतात. प्रत्येक जिल्हा, तालुका व गावाची कोविड-१९ त्या संसर्गाबाबतची सद्यस्थिती विविध माध्यमांद्वारे शासनास अवगत करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे पत्रकार व वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी यांना 'फ्रंटलाईन वर्कर्स' चा दर्जा देवून त्यांचे लसीकरण करणे आवश्यक आहे त्यामुळे राज्यातील सर्व पत्रकारांचे लसीकरणाबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा असे छगन भूजबळ सूचवतात.
 
 
 
महाराष्ट्राने कोरोनाच्या लढाईत अनेक महत्वाचे निर्णय घेत कोरोनाला अटकाव करण्याचे यशस्वी प्रयत्न केले आहे. सततच्या वाढणाऱ्या कोरोना रूग्णांच्या संख्सेत घट व्हावी यासाठी आपण लसीकरणावर जोर दिला आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना आपण प्राधान्याने लस दिली तशीच आता पत्रकारांना देखील तातडीने लस देणे गरजेचे आहे, असे मत या पत्रात



छगन भुजबळ यांनी मांडले आहे. देशातील इतर काही राज्यांनी याबाबत सकारात्मक निर्णय घेत पत्रकारांना लस दिली आहे. त्यामुळे आपण देखील आपल्या राज्यातील पत्रकार व वृत्तवाहिन्याचे प्रतिनिधी यांनाही 'फ्रंटलाईन वर्कर्सचा' दर्जा देण्यात यावी अशी विनंती देखील छगन भुजबळ यांनी केली आहे.
 


अग्रलेख
जरुर वाचा
राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, मला विचारल्याशिवाय...

राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, "मला विचारल्याशिवाय..."

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एक ठाम आणि स्पष्ट आदेश दिला आहे. राज ठाकरे यांनी सांगितले की, "पक्षातील कोणताही नेता, कार्यकर्ता, प्रतिनिधी यांनी कोणत्याही वृत्तपत्र, वृत्तवाहिनी किंवा डिजिटल माध्यमांशी संपर्क साधू नये. तसेच, स्वतःचे मत व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर अपलोड करणेही थांबवावे." याशिवाय, त्यांनी पक्षाचे अधिकृत प्रवक्ते यांनाही इशारा दिला आहे. राज ठाकरे म्हणाले, "ज्यांना अधिकृत प्रवक्त्याची जबाबदारी दिली आहे त्यांनी सुद्धा माझी परवानगी घेतल्याशिवाय ..

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचना व्हावी यासाठी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचित करत अधिसूचना जारी केली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121