'कामाची बातमी' : आठवड्याला तीन दिवस सुट्टी इतकंच नव्हे...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Feb-2021
Total Views |

Office _1  H x
 




नवी दिल्ली : केंद्र सरकार नोकरदारवर्गाला दिलासादायक बातमी देण्याच्या तयारीत आहे. सरकारी कंपन्यांमध्ये कामाची लवचिकता लक्षात घेऊन आठवड्याला चार दिवस काम आणि तीन दिवस सुट्टी, अशी योजना आणण्यासाठी मंजूरी देत आहे. त्यासाठी कर्मचाऱ्यांना तीन शिफ्टमध्ये काम करावे लागू शकते. त्यासोबतच आणखी काही महत्वाचे बदल केले जाऊ शकतात. वाचा सविस्तर...
 
 
आठवड्याला करावे लागणार ४८ तास काम
 
कामगार सचिव अपूर्वा चंद्रा यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, आठवड्याला ४८ तास काम करण्याचा नियम कायम राहणार आहे. मात्र, कंपन्यांना तीन शिफ्टमध्ये काम करण्याची मंजूरी दिली जाऊ शकते. १२ तासाच्या शिफ्टमध्ये काम करण्यासाठी आठवड्यात चार दिवस काम करावे लागेल. १० तास काम करणाऱ्यांसाठी पाच दिवस आठ तासांची शिफ्ट करणाऱ्यांसाठी सहा दिवस काम करावे लागणार आहे.
 
 
कर्मचाऱ्यांवर नसणार कुठलाही दबाव
 
 
तीन्ही शिफ्टमध्ये काम करण्यासाठी कर्मचाऱ्यांवर कुठलाही दबाव टाकला जाणार नाही. त्यात लवचिकता असणार आहे. बदलत्या कामाच्या कार्यशैलीनुरुप आणि गरजेनुसार हे बदल आवश्यक आहेत. हा लेबर कोडचा भाग असेल. हे नियम लागू झाल्यानंतर कंपन्यांना केंद्राच्या परवानगीची आवश्यकता राहणार नाही.
 
  
नवीन आठवडा सुरू करण्यापूर्वी द्यावी लागणार सुट्टी
 
चंद्र यांच्या मते, कंपन्यांना नवीन आठवडा सुरू करण्यापूर्वी कर्मचाऱ्यांना सुट्टी देणे आवश्यक आहे. जर कंपन्यांनी चार दिवसांचा आठवड्याचा पर्याय स्वीकारला तो तर तीन दिवस सुट्टी देणे आवश्यक आहे. पाच दिवसांचा आठवडा ठेवला तर दोन दिवास सुट्टी घेणे आवश्यक आहे. नव्या कामगार कायद्यांनुसार, ८ ते १२ तासांपर्यंत आठवडा निवडण्याचा अधिकार आहे. कंपन्यांच्या आवश्यकतेनुसार, शिफ्ट निवडावी लागणार आहे.
 
 
कामाचा ताण कमी करण्यासाठी हवी जास्त रजा
 
 
तणाव घालवण्यासाठी सुट्टीचा उपयोग व्हावा, अशी संकल्पना आहे मात्र, कित्येकदा सुट्टीत इतर कामे मार्गी लावण्याच्या सवयींमुळे ताण कायम राहतो. याचा परिणाम कामावर जाणवत असतो. आता नव्या नियमांमुळे कंपन्यांचाही फायदा होणार आहे. कर्मचारी जास्त सक्रीय राहून काम करतील. उत्पादन क्षमता वाढेल, असे अनुमान आहे.
 
 
आयटी क्षेत्राला मिळू शकतो फायदा
 
 
तज्ज्ञांच्याी मते, या नव्या कामगार कायद्यांचा फायदा आयटी आणि तत्सम सेवा देणाऱ्या क्षेत्रांना मिळू शकतो. बँकींग व आर्थिक सेवा देणारे कर्मचारी आठवड्याला २० ते ३० टक्के जण ४ ते ५ दिवसांची शिफ्ट करून दीर्घकालीन रजेवर जाऊ शकतात. ह्युमन रिसोर्सेस आणि वित्तीय सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन व्यवहारांमध्ये सहज हे धोरण लागू करता येऊ शकते.
 
 
रोजगार घटण्याची शक्यता
 
 
दरम्यान, काहींच्या मते, एका दिवसात १२ तास काम केल्यामुळे २४ तास सुरू राहणाऱ्या कंपन्यांमध्ये केवळ १ किंवा दोन शिफ्ट सुरू राहू शकतात. त्यामुळे रोजगारनिर्मितीला आळा बसू शकतो. दीर्घकाळ कामामुळे कर्मचाऱ्यांवर ताण निर्माण होऊ शकतो.




@@AUTHORINFO_V1@@