२० महिन्यांच्या प्रतिक्षेनंततर पुण्यातून आंतरराष्ट्रीय विमानसेवा पुन्हा सुरु

पुणे- दुबई विमान सेवा पुन्हा सुरु

    दिनांक  19-Nov-2021 23:29:51
|

Pune airport_1  
 
 
 
 
पुणे : २०२० मार्च महिन्यात पुणे शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. तेव्हा पासून खबरदारीचा उपाय म्हणून नागरी उड्डाण महासंचलनालया (डीजीसीए) कडून पुणे शहरातील आंतरराष्ट्रीय विमान उड्डाण त्वरित बंद करण्यात आली. कोरोना महामारीच्या काळात पुणे विमानतळावरून बंद करण्यात आलेली आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणे २० महिन्यांनी पुन्हा सुरु होणार आहेत. ही उड्डाण पुणे ते दुबई दरम्यान असणार आहेत. पूर्वी पुणे विमानतळावरून सिंगापूर, फ्रँकफर्ट आणि दुबई या तीन ठिकाणीच आंतरराष्ट्रीय उड्डाण होत असत. आता ही सेवा फक्त दुबई पुरतीच सुरु आहे. ही फक्त दुबई करताच सुरु असणारी सेवा पण कोरोना महामारीच्या काळात खबरदारीचा उपाय म्हणून डीजीसीए तर्फे बंद ठेवण्यात आली होती. मार्च २०२० पासून २० महिन्यानंतर ही पुणे विमानतळावरील आंतरराष्ट्रीय विमानसेवा पुन्हा सुरु होणार आहे.

भारत देशात २०२० च्या फेब्रुवारी महिन्यापासून कोरोना महामारीने हाहाकार माजवण्यास सुरुवात केली होती; त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून देशभरातील सर्वच आंतरराष्ट्रीय उड्डाणे काही क्षणातच बंद करण्यात आली होती. पुण्यात पण डीजीसीए ने खबरदारीचा उपाय म्हणून पुणे विमानतळावरून दुबई कडे जाणारी विमानसेवा त्वरित बंद केली होती . तब्बल २० महिने उलटून गेल्यानंतरही ही आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरु करण्यात आलेली न्हवती. कोरोनाची स्थिती जस जशी नियंत्रणात येत गेली तस तस पुण्यातील देशांतर्गत विमान सेवा सुरु करण्यात आली होती; मात्र दुबई ला जाणारी सेवा स्थगितच ठेवण्यात आली होती.

मात्र आता नागरी उड्डाण महासंचलनालयाने (डीजीसीए) पुणे शहरातील कोरोनाची स्थिती पाहता पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दुबईला जाणारी विमान सेवा पुन्हा सुरु करण्यास परवानगी दिली आहे. स्पाईसजेट या विमानसेवा देणाऱ्या कंपनी कडून लवकरच पुणे-दुबई आंतरराष्ट्रीय विमान सुरु होणार आहे. दुबईला जाणारे हे विमान पुण्याहून रोज सकाळी ७ वाजून ५ मिनिटांनी उड्डाण घेईल. लवकरच स्पाईसजेट या कंपनी कडून या विमान सेवेच्या तिकिटाचे दर आणि तिकीट बुक करायची वेळा जाहीर करण्यात येणार आहेत. तसेच इतर विमान सेवा देणाऱ्या कंपन्यांकडून सुद्धा पुण्याहून दुबई साठी विमान उड्डाणासाठी डीजीसीए कडे परवानगी मागण्यात आली असून डीजीसीए ने परवानगी दिल्यास इतर कंपन्या पण पुणे- दुबई ची विमान सेवा लवकरच सुरु करणार आहेत.

 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.