‘चटकदार चवदार, इथे स्थळं भेटतात!’

    दिनांक  06-Aug-2020 18:26:12
|
Aditya sai_1  H

‘चटकदार चवदार’ हॉटेलमधे रंगणार सई-आदित्यच्या कांदेपोह्यांचा कार्यक्रम!

मुंबई : झी मराठीवरील ‘माझा होशील ना’ या मालिकेने आता चांगलाच वेग घेतला आहे. सई आणि आदित्यच्या भांडणापासून सुरु झालेली त्यांची मैत्री आता प्रेमाचं वळण घेतेय की काय असं वाटत असतानाच एक नवाच पेच समोर उभा राहतोय. सईच्या आईवडीलांनी सईचं लग्न तोलामोलाच्या घरातच व्हावं म्हणून कंबर कसली आहे. 


इथे आदित्यकडेही नेमकी स्थळांची शोधाशोध सुरु झाली आहे. आदित्य आणि सई दोघांनाही हे बघण्याचे कार्यक्रम मान्य नाहीत, पण घरचे हट्टाला पेटलेत. मग या संकटात एकमेकांना साथ देण्यासाठी सई आणि आदित्य स्थळ पहायला तयार झालेत. हा कांदेपोह्यांचा खमंग कार्यक्रम रंगणार आहे, ‘चटकदार चवदार’ हॉटेलमधे! गुरुवार, शुक्रवार आणि शनिवारच्या भागात ही गंम्मत पहायला मिळणार आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.