महाराष्ट्रात नवे ‘ट्रान्सफर’ मंत्रालय : भाजप नेते चंद्रकांतदादा पाटील

    दिनांक  20-Aug-2020 14:12:39
|

Chandrakant Patil_1 
 
मुंबई : महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये बदल्यांचे नवे राजकारण होऊ पाहत आहे. अशामध्ये यावरून महाराष्ट्र सरकारवर भाजप तसेच विरोधी पक्षाकडून वेळोवेळी टीका केली जात आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी महाराष्ट्रात नव्या ट्रान्सफर मंत्रालयाची स्थापना झाली असल्याची खोचक टीका ट्विटरवरुन केली. याआधी राज्यातील मंत्र्यांनी अधिकाऱ्यांच्या बदल्यावरुन भ्रष्टाचार केल्याचा आरोप चंद्रकांतदादा पाटील यांनी केला होता.
 
 
 
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी ट्विटरवरून सांगितले आहे की, “महाराष्ट्रात एका नव्या मंत्रालयाची स्थापना करण्यात आली आहे. नाव आहे ट्रान्सफर मंत्रालय, मंत्री हे कोणी एक दोन नाहीत, तर अनेक आहेत. या मंत्रालयाचं 'बजेट' नाही... 'टार्गेट' असते,” अशी टीका करत त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.