५ ऑगस्टला फक्त भूमिपूजनच नव्हे तर रामराज्याची सुरुवात : योगी आदित्यनाथ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Jul-2020
Total Views |

CM Yogi Adityanath_1 


लखनऊ : अयोध्येत ५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या भूमिपूजनाच्या तयारीचा जल्लोष सुरू आहे. श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या स्थापनेत पाया रचण्याची प्रक्रीया सुरू केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शिलान्यास कार्यक्रम केला जाणार आहे. जसजशी ही तारीख जवळ येत आहे, तशा घडामोडी वेगाने घडत आहेत. राम मंदिर शिलान्यासाचा मुहूर्त काही दिवसांवर आल्यानंतर आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महत्वपूर्ण उल्लेख केला आहे. 
 
या पावन समयाची वाट पाहता अनेक पीढ्या संपल्या, रामाच्या नावाची आस्था असणाऱ्या रामभक्तांनी गेली पाच शतके या वेळाची वाट पाहिली आहे. कित्येक संकटांचा सामना करत राम मंदिर निर्माणासाठी संघर्ष करणाऱ्यांनी हार मानली नाही याचाच हा परिणाम आहे. राम मंदिर लवकरच पूर्णत्वास जाईल, कोट्यवधी लोकांच्या आस्थेचा विषय आणि धर्माचे प्रतिक बनणारे राम मंदिर , मर्यादा पुरुषोत्तम रामाचा वनवास कित्येक युगांपूर्वी संपला. परंतू दुसरा वनवास आता संपणार आहे. 

कित्येक युगांनंतर आपल्या जन्मभूमीतील सिंहासनावर प्रभू श्री राम विराजमान होणार आहेत. या काळात झालेल्या संघर्षगाथा उल्लेखनीय आहेत. यात योगदान देणाऱ्या संतमहंतांना विसरणे कठीण आहे. सर्वात आधी नाव घ्यावेसे वाटते ते दादागुरु ब्रह्मलीन गोरक्षपीठाधीश्वर महंत, श्री दिग्विजय नाथ जी महाराज याशिवाय परमपूज्य ब्रह्मलीन गोरक्षपीठाधीश्वर महंत श्री अवेद्यनाथजी महाराज या विभूतींनी राम मंदिर निर्माण अभियानात अकल्पनीय संघर्ष केला. 

राम मंदिर शिलान्यासावेळी त्यांच्या स्मृती न होणे असंभव आहे.परकीयांची सत्ता असताना राम मंदिर निर्माणासाठी पुढे येणारे महंत दिग्विजय नाथजी महाराज यांनी १९३४ पासून ते १९४९ पर्यंत वेळोवेळी संघर्ष केला. २२-२३ डिसेंबर रोजी १९४९ मध्ये विवादीत ढाँच्यामध्ये श्री राम प्रकट झाले त्यावेळी तत्कालीन गोरक्षपीठाधीश्वर महंत दिग्विजय नाथ जी महाराज साधू संतांसह तिथे किर्तन करत होते.

२८ सप्टेंबर १९६९ रोजी ते कालवश झाले. मृत्यूनंतरही राम मंदिराचा संघर्ष संपला नव्हता. महंत दिग्विजय नाथ यांच्या या संघर्षाची ज्योत त्यांचे शिष्य महंत श्री अवेद्यनाथ यांनी सुरू ठेवली. राम मंदिरासाठी साधू संतांचा मोठा समुह राम मंदिरासाठी तयार केला. १९८९ मध्ये राम मंदिर निर्माणासाठी प्रतिकात्मकपणे भूमिपूजन झाले. 

त्यावेळी पहिला फावटा स्वतः महंत श्री अवेद्यनाथ यांनी चालवला होता. यात परमहंस रामचंद्र दास यांचाही सहभाग होता. या प्रयत्नांत आधारशिला ठेवण्यासाठी मान कामेश्वर चौपाल यांना मिळाला होता. अशोक सिंहल यांचीही यात महत्वाची भूमिका होती. गेल्या तीन वर्षांपासून राम जन्मभूमी अयोध्येने दिपावली उत्सव पाहिला आहे. यंदाच्या आयोजनाची दृश्यही विशाल आणि भव्य दिव्य असतील. श्रीराम मंदिर निर्माण केल्यानंतर अयोध्या जागतिक पातळीवर धार्मिक आणि संस्कृती नगरी म्हणून ओळखली जाईल.

महामारीमुळे श्रीराम भक्त इच्छा इसूनही या कार्यक्रमात सहभागी होऊ शकत नाहीत. परंतू हे सत्य श्रीरामांची इच्छा मानून आता स्वीकार करायला हवे. शेवटी हा आपल्यासाठी गौरवाचा क्षण आहे. पाच ऑगस्ट हा दिन केवळ भूमिपूजनाचा कार्यक्रम आणि शिलान्यास दिवस नसेल तर एका नव्या युगाचा आरंभ या दिवसांनंतर होईल. हे रामराज्य असेल. 






@@AUTHORINFO_V1@@