सुशांत सिंह राजपूतबद्दल सुब्रमण्यम स्वामींचा नवा खुलासा!

    30-Jul-2020
Total Views | 111

SSR_1  H x W: 0



सुशांतची हत्याच झाल्याचा केला दावा!


 
नवी दिल्ली : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण सध्या अधिक गुंतागुंतीचे होत चालले आहे. आता भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी देखील एक फोटो पोस्ट करत, सुशांतने आत्महत्या केली नव्हती, तर त्याची हत्याच झाली होती, असा दावा केला आहे. सुशांत १४ जून रोजी मुंबईच्या वांद्रे येथील त्याच्या अपार्टमेंटमध्ये मृत अवस्थेत आढळला होता.

 
 
स्वामींनी गुरुवारी एक ट्विट केले, ज्यामुळे सोशल मीडियावर पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. सुशांतची हत्याच झाली असे त्यांना का वाटते, असे म्हणत ट्विटमध्ये त्याने एक कागदपत्र शेअर केले आहे ज्यात त्याने हत्येचे मुद्दे ठळकपणे मांडले आहेत. सुशांतच्या गळ्यावर असलेल्या खुणा आत्महत्येचे संकेत देत नसल्याचे त्यांनी म्हंटले आहे. स्वामींनी पोस्ट केलेल्या कागदपत्रात सुशांतशी संबंधित एकूण २६ मुद्द्यांविषयी बोलले गेले आहे. यापैकी केवळ दोनच मुद्दे आत्महत्येच्या सिद्धांताला समर्थन देतात, त्याखेरीज सर्व मुद्दे हत्येच्या दिशेने बोट करतात.







यापूर्वी बुधवारी सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्वीट करून म्हटले होते की, ‘बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याशी फोनवर मी बोललो आहे. एफआयआर आणि सविस्तर तपासणीसाठी मी पाटणा पोलिस आणि त्यांच्या तपास पद्धतीचे कौतुक केले आहे. आता (महाराष्ट्र व पाटणा पोलिसांद्वारे) दोन तपास चालू आहेत, मी सीबीआयच्या तपासासाठी पुढाकार घेईन. नितीशकुमारांनीही याला होकार दर्शवत, मला यात काहीच आक्षेप नाही पण सुशांतला न्याय मिळावा आणि दोषींवर कारवाई करावी अशी त्यांची इच्छा व्यक्त केली आहे.’







अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121