मराठी रंगभूमीवरचा अभिनव प्रयोग : इंटरनेटवरील लाईव्ह नाटक अर्थात ‘नेटकं’!

    10-Jul-2020
Total Views |

netak_1  H x W:



अभिषेक बच्चनच्या हस्ते झाले ‘नेटक.लाइव्ह’ व्यासपीठाचे अनावरण!


मुंबई : मराठी रंगभूमीवरील आणखी एक आगळा आणि क्रांतिकारी प्रयोग म्हणून ज्याच्याकडे पहिले जात आहे, ते मराठीतील पहिले वहिले “नेटक.लाइव्ह”म्हणजे इंटरनेटवरील लाइव्ह नाटक ‘मोगरा’चा शुभारंभ १२ जुलै रोजी होत आहे. या व्यासपीठाचे अनावरण बॉलीवूड अभिनेता अभिषेक बच्चन यांनी काल केले. या नाट्यप्रयोगाची तोंडभरून स्तुती करताना आपण हा प्रयोग पाहण्यास अधीर झालो आहोत, असेही त्यांनी म्हटले आहे.


या व्यासपीठाचे अनावरण केल्यावर अभिषेक बच्चन यांनी एक बोलके ट्वीट केले आहे. “अत्यंत अद्वितीय, अग्रणण्य आणि विस्मयकारक असा हा प्रयोग माझा मित्र आणि सहकारी हृषिकेश जोशी घेवून येत आहे. त्याला माझ्या शुभेच्छा. मी हा प्रयोग पाहण्यास आतूर आहे,” असे ते या ट्वीटमध्ये म्हणतात.


काही दिवसांपूर्वी समाजमाध्यमांमध्ये “शुभारंभाचा नाट्यप्रयोग तुमच्या आवडत्या नाट्यगृहात १२ जुलै रोजी” असा संदेश फिरला आणि सर्वांच्याच भुवया ऊंचावल्या. मराठी नाट्यरसिकांमध्ये जोरदार चर्चा झाली. नाटक सुरु होणार ही गोष्ट सुखावणारी असली तरी या पोस्टर व क्लिपने अनेक प्रश्नही रसिकांच्या मनात उभे राहिले. त्या सगळ्या शंकांची आणि प्रश्नांची उकल आता झाली आहे.


आपल्या सगळ्यांचा आवडता कलाकार हृषिकेश जोशी यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्याच दिग्दर्शनाखाली मराठीतील पहिले वाहिले “नेटक.लाइव्ह”म्हणजे इंटरनेटवरील लाइव्ह नाटक ‘मोगरा’चा रविवारी १२ जुलै रोजी शुभारंभाचा प्रयोग होत आहे. तेजस रानडे यांनी लिहिलेल्या या नाटकात आघाडीची नाट्य, चित्रपट कलाकार स्पृहा जोशी भार्गवी चिरमुले, वंदना गुप्ते सुद्धा असणार आहे. नाटकाला अजित परब यांचे संगीत आहे. या नाटकाचा टीझर काल दाखल केला गेला. लॉकडाऊनच्या या काळात अशाप्रकारे इंटरनेटवरून सदर होणाऱ्या या नाटकाबद्दल मराठी रसिकांमध्ये प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे.


शेकडो वर्षांच्या इतिहासात मराठी रंगभूमीने अनेक आव्हाने पेलली, उलटवून लावली आणि ती नव्या उभारीने समर्थपणे उभी राहिली. निरनिराळे प्रयोग करत आणि बदल घडवून आणत रंगभूमीने आणि रंगकर्मींनी मराठी नाटक जिवंत ठेवले. ‘मोगरा’च्या माध्यमातून तोच अध्याय पुन्हा एकदा गिरविला जाणार आहे. मायबाप प्रेक्षक मराठी रंगभूमीने पेललेल्या प्रत्येक आव्हानाच्या वेळी खंबीरपणे नाटकाच्या मागे उभे राहीले आहेत. यावेळीही ते या प्रयोगाच्या मागे उभे राहतील, याची पूर्ण खात्री ठेवत हा अनोखा प्रयोग सादर होणार आहे असे हृषिकेश जोशी म्हणाले




अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121