मुंबईकरांनो उगाच घराबाहेर पडू नका !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Jun-2020
Total Views |

mumbai_1  H x W
मुंबई : मुंबईमध्ये अनलॉक १ चालू झाल्यानंतर काही नियमांमध्ये शिथिलता दिली आहे. परंतु, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता काही नागरिक विनाकारण घराबाहेर पडत आहेत. मुंबईतील पोलिसांनी कडक नाकाबंदी करून अशा विनाकरण बाहेर पडणाऱ्या नागरिकांवर कारवाई केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर पोलिसांनी ही कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे मुंबईकरांनो विनाकारण वाहने घेऊन घराबाहेर पडू नका असे साग्न्यात येत आहे.
 
 
दिवसेंदिवस मुंबईमध्ये कोरोनाग्रस्तांचा आलेख चढताच राहिला आहे. मुंबईसह पुणे आणि ठाणे जिल्ह्यामध्ये सर्वाधीक कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून येत आहेत. एकमेकांच्या संपर्कातून हा आजार फैलावत असल्याने नागरिकांनी घरातच थांबावे, विनाकारण बाहेर पडू नये असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला केलं आहे. मात्र, तरीही लोक घराबाहेर पडताना दिसत आहेत. सोमवारी सर्व महत्त्वाच्या ठिकाणी वाहनाची गर्दीदेखील पहायला मिळाली.
 
 
रविवारी मुंबईतील छोट्या-मोठ्या रस्त्यांवर पोलिसांनी नाकाबंदी सुरू केली. रविवार असल्याने मोठ्या प्रमाणावर लोक वाहने घेऊन रस्त्यावर उतरले होते. त्यामुळे पोलिसांनी ही नाकाबंदी केली. दिवसभरात वाहतूक पोलिसांनी पाच हजाराहून अधिक वाहने जप्त केली. वाहतूक पोलिसांनी एवढ्या मोठ्या प्रमाणावर कारवाई करूनही मुंबईकरांमध्ये काही फरक पडलेला दिसत नाही.
 
 
@@AUTHORINFO_V1@@