गौरवास्पद! पालिकेत 'या' विभागात प्रथमच महिला अधिकाऱ्याची नियुक्ती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Jun-2020
Total Views |
Archana Achrekar_1 &



अभियंता अर्चना आचरेकर यांची मुंबई महापालिका अभियांत्रिकी सेवा व प्रकल्पांच्या संचालकपदी नेमणूक


मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सेवेत १९८४ पासून असणाऱ्या अभियंता अर्चना आचरेकर यांची अभियांत्रिकी सेवा व प्रकल्प संचालक या पदावर महापालिका नेमणूक करण्यात आली आहे. अभियांत्रिकी सेवा व प्रकल्प विषयक संचालकपदी महापालिकेच्या इतिहासात प्रथमच एका महिलेची नेमणूक झाली आहे. यापूर्वी आचरेकर या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 'नगर अभियंता' म्हणून कार्यरत होत्या.


भारतातील अभियांत्रिकीय शिक्षणाचा पाया घालणाऱ्या मुंबईतील 'वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट' येथून अभियांत्रिकीचे पदवीपर्यंतचे शिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर आचरेकर या जानेवारी १९८४ मध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सेवेत दुय्यम अभियंता म्हणून रुजू झाल्या होत्या. महानगरपालिकेतील आपल्या कारकिर्दी दरम्यान त्यांनी विविध खात्यातील विविध पदांवर काम केले आहे. आचरेकर यांची 'संचालक' पदी नियुक्ती झाल्यामुळे प्रथमच या पदावर एक ज्येष्ठ महिला अधिकारी विराजमान झाल्या आहेत.




@@AUTHORINFO_V1@@