धक्कादायक ! एका आठवड्यात मुंबईत १,१५७ नवे कंटेन्मेंट झोन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Jun-2020
Total Views |

containment zone_1 &




मुंबई :
मुंबईतील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येबरोबर कंटेन्मेंट झोनच्या संख्येतही वाढ होत आहे. गेल्या आठ दिवसांत तब्बल १,१५७ कन्टेंमेंट झोन वाढले आहेत. ६,६१६ इमारती अथवा इमारतीचे मजले सील करण्यात आले आहेत. तर ७,६५ झोपडपट्टी-चाळी सील केल्या आहेत. मुंबईतील कोरोना बाधितांचा आकडा ६९,६२५ वर पोहोचला असून ३,९६२ दगावले आहेत. तर दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत ३७,०१० रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आल्याचे पालिका आरोग्य विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.


भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएसआर) तत्त्वानुसार कोरोना रुग्ण आढळल्यास पूर्ण विभाग सील न करता आता ते घर अथवा इमारतीचा भाग सीलबंद केला जातो. सध्या कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या वाढत असून कंटेन्मेंट झोनची संख्याही वाढत आहे. आजही मुंबईत ७६५ चाळ व झोपडपट्टी विभागातील काही भाग सील करण्यात आले आहे. तर ज्या इमारतीत कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळला तो रुग्ण अथवा इमारतीतील परिस्थिती पाहून सील करण्याचा निर्णय घेतला जातो. सध्या मुंबईत ६,११६ इमारती सील करण्यात आल्या असून सात दिवसांपूर्वी हा आकडा ४,९५९ इतका होता. त्यामुळे गेल्या ८ दिवसांत १,१५७ इमारती अथवा इमारतीचे मजले सील करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
@@AUTHORINFO_V1@@