महाविकास आघाडीत 'कुरकूर' सुरूच : काँग्रेसला हव्या समसमान जागा

    दिनांक  24-Jun-2020 14:18:32
|
Ashok Chawan_1  

काँग्रेसने विधान परिषदेवर मागितल्या चार जागामुंबई : विधान परिषद जागांसाठी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांना समसमान जागा मिळाव्यात,अशी ठाम भूमिका काँग्रेसने घेतली आहे. यामुळे नुकतिच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणाऱ्या काँग्रेस नेत्यांची कुरकूर पुन्हा दिसून येत आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गेलेल्या मंत्री अशोक चव्हाण यांनीच ही मागणी केल्याने पुन्हा शिवसेनेची डोकेदुखी वाढणार आहे.
आगामी राज्यपाल नियुक्त बारा विधान परिषद जागांसाठी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांना समसमान जागा मिळाव्यात, अशी कॉंग्रेसची भूमिका आहे. ही आमची भूमिका कायम आहे. अशी प्रतिक्रिया कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी दिली आहे. याबद्दल आता महाविकास आघाडीतील नेते तोडगा काढतात की, काँग्रेस समोर पुन्हा नमते घेतात हे येत्या काळात महाराष्ट्राची जनता पाहणार आहे.आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.