कोरोनाकाळात ‘लॉ ऑफ लव्ह’ चित्रपटाच्या फर्स्टलूकचे डिजिटल अनावरण!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-May-2020
Total Views |
LAW OF Love_1  

लॉकडाऊनमधल्या डिजिटल जीवन लक्षात घेऊन साधला चित्रपटाचा मुहूर्त!


मुंबई :
कोरोनाचे रोजच्या रोज बदलणारे आकडे, चढते आलेख, कधी कधी मनाला चटका लावणाऱ्या घटना तर कधी परिस्थिती नियंत्रणात येतानाच्या दिलासादायक बातम्या.... मानवी मनाला आता अशा चढ उतारांशी रोज सामना करावा लागतोय. आज काहीही न करता स्ट्रेस लेव्हल म्हणजेच मनावरील ताणतणाव वाढताना दिसतोय. आणि या करीताच ऑनलाईन योगा क्लासेस, ऑनलाईन मोटिव्हेशन लेक्चर्स इ. डिजिटल जनजागृती वाढताना दिसतेय.


करमणूक हा मोटिव्हेशनचाच एक भाग असून आपल्या आयुष्याचा एक महत्वाचा घटक आहे आणि यानंतरही राहणार आहे. मनावरील ताण कमी करण्यासाठी चित्रपटच्या माध्यमातून होणारी करमणूक नेहमीच उपयुक्त ठरली आहे.


लॉकडाऊनचा फटका आपल्या चित्रपटसृष्टीला देखील बसला आहे. वेगवेगळ्या मालिका, चित्रपटांचे चित्रीकरण अर्ध्यातून थांबवण्यात आले, चित्रपटगृहे बंद झाल्यामुळे नव्या चित्रपटांचे प्रदर्शन तसेच नव्या चित्रपटांचे प्रोमोशन रखडले आहेत. आणि याच वेळेचा सदुपयोग करत एका सकारात्मक दृष्टिकोनातून निर्माता आणि पटकथाकार जे. उदय रसिकप्रेक्षकांसाठी नवा मराठी चित्रपट "लॉ ऑफ लव्ह" घेऊन येत आहेत. सध्या डिजिटली जास्तीत जास्त लोकं "ऍक्टिव्ह" असल्याने निर्मात्यांनी याच वेळेला आपली संधी मानत "लॉ ऑफ लव्ह" च्या फर्स्ट लूक पोस्टरचं अनावरण सोशल मीडियावर केलं आणि या पोस्टर ला चांगला प्रतिसाददेखील मिळत आहे.


चित्रपटाचं नाव जितकं हटके आहे तितक्याच हटके त्याची कहाणी असेल यात काहीच शंका नाही. चित्रपटाचे निर्माता आणि पटकथाकार जे. उदय यांचा हा पहिलाच चित्रपट आहे. लॉकडाऊननंतर प्रेक्षकांच्या बदललेल्या आयुष्यात मनोरंजनासाठी हा चित्रपट उत्तम पर्याय ठरणार आहे. या चित्रपटात नक्की कोणकोणते कलाकार असणार आहेत, कोणत्या नव्या गोष्टी असणार आहेत ही माहिती अद्याप गुलदस्त्यातच ठेवण्यात आली आहे.


चित्रपटाबद्दल सांगताना निर्माते जे. उदय म्हाता, "प्रेमाची नवी परिभाषा लोकांसमोर मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे, सध्याची परिस्थिती पूर्णपणे जाणता खास सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असलेल्या लोकांसाठी नवं काहीतरी देण्याचा एक प्रयत्न म्हणून आम्ही फर्स्ट लूक पोस्टरचं अनावरण केलं आहे. लॉकडाऊन च्या काळात उत्सुकता वाढविणे आणि सर्व सुरळीत चालू झाल्यावर प्रेक्षकांना लार्जर द्यान लाईफ अनुभव देण्याचे आमचे ध्येय आहे."
@@AUTHORINFO_V1@@