दिवंगत अभिनेते ऋषी कपूर आणि इरफान खानवर वादग्रस्त टिप्पणी!

    22-May-2020
Total Views | 131

KRK_1  H x W: 0


चर्चेत येऊ पाहणाऱ्या कमाल खानविरुद्ध एफआयआर दाखल


मुंबई : अभिनेता कमल राशिद खान यांने दिवंगत अभिनेते ऋषी कपूर आणि इरफान खान यांच्याबद्दल अपमानास्पद ट्विट केल्याने मुंबईच्या वांद्रे पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध भादंवि कलम २९४ अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. युवा सेनेच्या कोअर कमिटीचे सदस्य राहुल कनाल यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


ऋषी कपूर आणि इरफान खान यांच्या निधनाला आता २० दिवसांहून अधिक काळ झाला आहे. परंतु हे दोन्ही कलाकार रुग्णालयात मृत्यूशी झगडत असताना कमल आर खानने अनेक निंदनीय व चुकीचे शब्द वापरुन या दोघांविरूद्ध ट्विट केले होते. केआरकेसाठी हे नवीन नाही. चर्चेत राहण्यासाठी तो नेहमीच बड्या कलाकारांबाबत सोशल मीडियावर आपले वादग्रस्त मत व्यक्त करत असतो.


कमाल खानने हे वादग्रस्त ट्विट अकाऊंटवरून काढून टाकले असले तरी त्याच्या विरोधात कडक कारवाईची मागणी केली जात आहे.


कमाल खानाने ऋषी कपूर यांची खिल्ली उडवलेली!




KRK_1  H x W: 0



इरफान खानच्या मृत्यूनंतर कमाल खानने गरळ ओकली होती.  



KRK_1  H x W: 0
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121