'नवरी नटली' फेम छगन चौगुले यांचे कोरोनामुळे निधन

    दिनांक  21-May-2020 14:19:17
|

Chhagan Chaugule_1 &


कोरोनाचा उपचार घेत असताना प्राणज्योत मालवली


मुंबई : 'नवरी नटली' फेम लोककलावंत छगन चौगुले यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. त्यांची कोरोना चाचणी सकारात्मक आल्यामुळे मुंबई येथील सेव्हन हिल्स रुग्णालात त्यांच्यावर उपचार सुरु होते. उपचार सुरु असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. छगन चौगुले यांनी 'कथा चांगुणाची', 'कथा श्रावण बाळाची', 'आईचे काळीज', 'अंबाबाई कथा : कथा तुळजापुरची भवानी', 'कथा देवतारी बाळूमामा' यांसारखे कार्यक्रम सादर केले. या कार्यक्रमाच्या ध्ननिमुद्रीका विशेष गाजल्या. मात्र, छगन चौगुले यांना विशेष ओळख मिळवून दिली ती 'खंडेरायाच्या बानू लग्नाला नवरी नटली काल बाई सुपारी फुटली' या गाण्याने. आजही अनेक टीव्ही शो, शाळा महाविद्यालयांचे युवा महोत्सव आणि विविध कार्यक्रमात 'नवरी नटली' हे गाणे वाजवले जाते.


छगन चौगुले हे हाडाचे लोककलावंत होते. त्यांनी लोककलेचे विशेष असे कोणतेही प्रशिक्षण घेतले नव्हते. तरीही त्यांची कला सादर करण्याची कौशल्य अफलातून होते. त्यांची सुरुवात ही जारण गोंधळाच्या कार्यक्रमातून झाली. परंतु, केवळ जागरण गोंधळाचे कार्यक्रम न करता त्यांनी स्वत:तील कलेला व्याप्त स्वरुप दिले. ज्यामुळे महाराष्ट्राला एक नवा लोककलावंत मिळाला होता. संगीत ऐकण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणारी पिढीही त्यांचा कार्यक्रमांना आवर्जून हजेरी लावत.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.