‘प्यार करोना’नंतर सलमान खानचे नवे 'तेरे बिना' गाणे प्रदर्शित!

    दिनांक  12-May-2020 12:23:20
|

tere Bina_1  H


गाण्यात पाहायला मिळणार सलमान खान आणि जॅकलिन फर्नांडिस रोमँटिक केमिस्ट्री!


मुंबई : सलमान खान आणि जॅकलिन फर्नांडिस यांचे 'तेरे बिना' हे नवीन गाणे मंगळवारी दुपारी १२ वाजता प्रदर्शित करण्यात आले. सलमानच्या या नव्या गाण्याची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. या गाण्यामध्ये सलमान आणि जॅकलिनची रोमँटिक केमिस्ट्री प्रेक्षकांना नक्कीच भुरळ पडणार आहे. अलीकडेच सलमानने या गाण्याचा टीझर इंटरनेटवर प्रदर्शित केला होता. विशेष म्हणजे सलमान खानच्या पनवेल फार्महाऊसवर या गाण्याचे चित्रीकरण करण्यात आले आहे.


खरे तर सलमान काही काळ फार्महाऊसवर वेळ घालवण्यासाठी आला होता, त्यानंतर देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला, त्यामुळे दाबंग खान तिथेच अडकला आहे. या वेळेचा सदुपयोग म्हणून सलमानने नवीन प्रयोग करायला सुरुवात केली. त्याने लॉकडाऊन काळात कोरोना व्हायरसवरील ‘प्यार करोना’ हे गाणे प्रदर्शित केले. ‘प्यार करोना’च्या यशानंतर सलमानचे चाहते त्याच्या आगामी गाण्याची आतुरतेने वाट पाहत होते.


सलमानच्या कुटुंबाशिवाय जॅकलिन फर्नांडिस, युलिया वंतूर, वलुशा दे सुसा आणि आयुष शर्मा हेही सलमानसह फार्महाऊसमध्ये अडकले आहेत. लॉकडाऊनचे सर्व नियम पळत सलमानने या गाण्याचे चित्रीकरण केले आहे. ‘तेरे बिना’ गाणे सलमान खानने गायले आहे. सलमानचा मित्र अजय भाटिया यांनी संगीतबद्ध केले असून, शब्बीर अहमद यांनी लिहिले आहे. चार दिवसात सलमानच्या या नव्या गाण्याचे चित्रीकरण पार पडले आहे.


सलमान शहरापासून दूर आहे, परंतु लॉकडाऊन दरम्यान दररोजच्या कामगारांना काही कमी पडणार नाही, याची काळजी तो घेत आहे. लॉकडाऊन नियमांचे पालन करत चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी तो सतत नवनवीन व्हिडीओ तयार करत आहे. अलिकडेच सलमान खानने बैलगाडी व ट्रॅक्टरमध्ये रेशन भरुन गरजूंसाठी रेशन पाठविले. आता त्याने ‘बीइंग हॅंग्री’ नावाचा फूड ट्रक सुरू केला आहे, यामार्फत तो आता गरजूंना अन्नधान्य पुरवणार आहे.आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.