आता घरबसल्या लुटा कान्स, बर्लिन चित्रपट महोत्सवाचा आनंद

    दिनांक  28-Apr-2020 13:22:36
|

we are one_1  H
 
 
नवी दिल्ली : कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावाने संपूर्ण जग त्रस्त आहे. अशामध्ये जगभरामध्ये अनेक ठिकाणी सर्व महत्त्वाचे कार्यक्रम, स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे चित्रपटांसाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या कान्स, बर्लिन, टोरोंटो चित्रपट महोत्सवासारखे आंतरराष्ट्रीय दर्जाचे कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या सर्वांनी एकत्र येऊन २९ मेपासून युट्युबवर डिजिटल चित्रपट महोस्तव भरणार आहे. त्यामुळे आता तुम्ही घरबसल्या या चित्रपटांचा आस्वाद घेऊ शकता. यातून येणारी रक्कम ही ‘डब्ल्यूएचओ’च्या कोरोना फंडामध्ये जमा करण्यात येणार आहे.
 
 
 
 
 
‘बीएफआय लंडन फिल्म फेस्टिव्हल’, ‘जेरुसलेम फिल्म फेस्टिव्हल’, ‘मुंबई फिल्म फेस्टिव्हल’ आणि ‘माराकेच इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’, तसेच ‘सनडन्स फिल्म फेस्टिव्हल’ आणि ‘ट्रीबिका फिल्म फेस्टिव्हल’ असे जगभरातील वीस महोस्तवांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. मागच्याच महिन्यामध्ये होणारा कान्स चित्रपट महोस्तव लॉकडाऊनमुळे पुढे ढकलण्यात आला होता. त्याचाही समावेश यामध्ये करण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला आहे. त्यामुळे ‘वी आर वन – जागतिक चित्रपट महोस्तव’ या नावाने युट्युबवर मोफत जागतिक आणि उत्कृष्ट दर्जाचे चित्रपट पाहण्याची संधी जगभरातील चित्रपट प्रेमींना मिळणार आहे.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.