नाशिकमध्ये आलेला 'तो' गूढ आवाज कशाचा...?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Apr-2020
Total Views |
Super sonic sound_1 
 
 
 
 
नाशिक : नाशिकमध्ये बुधवारी सकाळी अचानकपणे आलेल्या या गूढ आवाजाचे रहस्य काय यावरून वेगवेगळे तर्क-वितर्क लढविले जात होते. लॉकडाऊनच्या काळात सर्वकाही ठप्प असताना शांत शहरात या आवाजाने साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले. सकाळी ११ ते ११.३० वाजेच्या दरम्यान शहरासह लगतच्या परिसरात अचानक एक मोठा आवाज झाला होता. सुरवातीला भूकंपा सारखा आवाज झाल्याने सर्वच शहरात उलटसुलट चर्चा सुरू होती. काहींनी याबाबत सोशल मीडियावर पोस्टही टाकल्या. त्यामुळे प्रत्येक जण तर्कवितर्क लावत वेगवेगळे अंदाज व्यक्त केले होते.
 
 
याबाबत सातत्याने नागरिकांनी जिल्हा प्रशासनातील पल्या मित्रपरिवार अधिकार्‍यांकडे ही चौकशी केल्यानंतर प्रशासनही या गूढ आवाजाबाबत तपास करू लागले सध्याच्या परिस्थितीमध्ये कोरोना पार्श्वभूमीवरती लोकांमध्ये वेगवेगळे तर्कवितर्क मध्ये भूकंप व जमीन फुटली यासारखे अंदाज व्यक्त केले काहींनी तर थेट देवाची करणी असल्याचेही अंदाज व्यक्त करून संभ्रम निर्माण करणारी अवस्था निर्माण केली होती.
 
 
नाशिक शहरात बुधवारी सकाळी झालेला तो गूढ आवाज भारतीय हवाई दलातील सुपर सोनिक या विमानाच्या चाचणी च्या दरम्यान आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तो गुढ आवाज हा ओझरच्या एच ए एल येथील सुपर सोनिक या विमान चाचणी दरम्यान आल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. शहराजवळ असलेल्या हवाईदलाच्या ओझर हवाई केंद्रातून सातत्याने विमानाची चाचणी ही शहरांमध्ये येऊनही घेतली जाते त्यामुळे शहरांमध्ये सातत्याने विमानांची वाहतूक चालूच असते परंतु शहराच्या सीमेलगत ओझरमधील सुपर सोनिक या विमानाच्या चाचणी दरम्यान असे आवाज येत असतात परंतु सर्वसामान्य लोकांना या विषयावरती माहिती नसल्याकारणाने अचानक आलेल्या आवाजामुळे जी काही का घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते ते प्रशासनाच्या खुलाशाने दूर झाले आहेत. या खुलाशानंतर नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला.
 
 
काय आहे सुपरसोनिक
 
सुपरसोनिक ट्रॅव्हल म्हणजे ऑब्जेक्टच्या प्रवासाचा दर जो आवाजाच्या गतीपेक्षा जास्त असतो. समुद्र पातळीवर २० डिग्री सेल्सियस तपमानाच्या कोरड्या हवेत प्रवास करणे या वस्तूंसाठी हा वेग अंदाजे ३४३.२ मी से आहे. आवाजाच्या गतीच्या पाच पटपेक्षा जास्त वेग बर्‍याचदा हायपरसॉनिक म्हणून ओळखला जातो. फ्लाइट्स ज्या दरम्यान ऑब्जेक्टच्या सभोवतालच्या हवेतील काही भाग जसे की रोटर ब्लेडचे टोक, सुपरसोनिक वेगापर्यंत पोहोचतात त्यांना ट्रान्सोनिक म्हणतात. हे सामान्यत: माच ०.८ आणि माच १.२ दरम्यान कुठेतरी आढळते. पाण्याच्या तपमानावर सुपरसोनिक वेग १,४४० मीटर / से (४,७२४ फूट/ से) पेक्षा जास्त वेग मानला जाऊ शकतो. घनरूपांमध्ये, ध्वनी लाटा रेखांशाच्या किंवा ट्रान्सव्हर्सली ध्रुवीकरण केल्या जाऊ शकतात आणि त्यापेक्षा जास्त वेग असू शकतात. सुपरसोनिक फ्रॅक्चर म्हणजे ठिसूळ सामग्रीतील ध्वनीच्या वेगापेक्षा वेगवान क्रॅक मोशन आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@