श्री गुरुजी रुग्णालय संचालित सेवा संकल्प समितीचे सेवाभावी कार्य

    दिनांक  31-Mar-2020 17:52:50
|

Shree Guruji Hospital Nasनाशिक : श्री गुरुजी रुग्णालय संचालित सेवा संकल्प समिती मार्फत सध्या करोणा विषाणूचा वाढता प्रभाव व संचारबंदी मुळे प्राथमिक आरोग्य सुविधा देण्याकरीता २२ आरोग्य रक्षकांना पुढील औषधी देण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कार्यातून सेवा संकल्प समिती सेवाभावी कार्य करत असल्याची प्रतिक्रिया समाजमनात उमटत आहे.

 

सेवा संकल्प समितीच्या माध्यमातून पॅरासीटामॉलच्या गोळ्या, सितोफलाद वटी, संजीवनी वटी, वेखंड, अॅस्थालीन सोल्युशन वाफारा मशीनसाठी, ओआरएस, कॉटन मास्क माहितीपत्रक, सॅनीटायजर, निरगुडी तेल आदी औषधांचे वाटप करण्यात येत आहे. दोनशे भूमिहीन गरज कुटुंबाना सरकारी मदत मिळण्या आगोदर तात्पुरती मदत प्राप्त व्हावी याकरीता ५ किलो तांदुळ,२ किलो उडीद दाळ, २ लिटर तेल, १०० ग्रॅम चटणी चे देखील वाटप करण्यात येत आहे. रोज ५० फुड पॅकेटचे पायी आपल्या घरी रवाना होणाऱ्या नागरिकांना वाटप करण्यात येत आहे.
 

दरम्यान, आजवर सेवा संकल्प समितीच्या माध्यमातून नाशिक शहरा पासुन ७० ते १०० कि.मी अंतरावर असणाऱ्या दुर्गम वनवासी भागातील ४० गावांमधे आरोग्य, शिक्षण, कौशल विकास, सेंद्रीय शेती, जल उपक्रम, महिला सबलीकरण आदी प्रकारच्या सहा आयामावर गत तीन वर्षापासून कार्य केले जात आहे.

 

तरी या उपक्रमासाठी ५०० ते १००० रु. देणगी देण्याचे आवाहन समितीच्या माध्यमातून करण्यात आले आहे. तसेच, देणगी जमा केल्यानंतर त्याचे फोटो सोबत पुर्ण नाव, पत्ता या 9850089848 (शैलेंद्र) वाट्स अॅप नंबरवर पाठवावा असे समितीच्या वतीने कळविण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी शैलेंद्र डोळस -9373475993, डॉ महेश भोसले 7620418748, केतन रनखांबे 9890066678, प्रकाश खेतान 8080023666 यांच्याशी संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे.

 

येथे जमा करावी देणगी

सेवा संकल्प समिती

ठाणे जनता सहकारी बँक नाशिक

खाते क्र. (Account no) : 016110100011794

आयएफएससी कोड (Ifsc code) : -TJSB0000016

८०जी करीता

डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठाण

स्टेट बँक ऑफ इंडिया, क्रांती चौक, औरंगाबाद

खाते क्र. (Account no) : 0011134725060

आयएफएससी कोड (IFSC code) : SBIN0001716

२०१६ पासून सेवा संकल्प समितीच्या वतीने काम करण्यात येत आहे. वनवासी पाडे व सेवावास्ती येथे आरोग्यदायी सुविधा देण्याचा चे कार्य केले जाते. कोरोना पार्शभूमीवर वनवासी पाड्यांवर सरकारी मदत पोहचण्यास विलंब होत आहे. त्यामुळे सेवा संकल्प समिती तेथील भूमीहीन कातकरी अशा २०० कुटुंबासाठी तांदूळ, दाळ, तेल आणि चटण्या यांचे प्याकेट उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नात आहे. तसेच, सेवा संकल्प समितीचे आरोग्यरक्षक यांच्या कडे प्राथमिक उपचारासाठी औषधे कीट देण्यासाठी सेवा संकल्प समितीच्या वतीने देणगीसाठी आवाहन करण्यात आले आहे.

- शैलेन्द्र डोळस, प्रकल्प समन्वयक, सेवा संकल्प समिती प्रकल्प

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.