मध्यरात्रीपासून संपूर्ण महाराष्ट्र बंद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Mar-2020
Total Views |
Uddhav Thackery_1 &n
 
 
 
मुंबई : कोरोना विषाणूच्या फैलावाला आळा घालण्यासाठी महाराष्ट्रात 'लॉकडाऊन'ची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. राज्यभरात आज मध्यरात्रीपासून कलम १४४ लागू केले जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. यामुळे पाच पेक्षा जास्त जणांचा समूह एकत्रित फिरू शकणार नाही. कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या ही गुणाकाराने वाढण्याची भीती गेले काही दिवस आहे. 
"कोरोना विषाणूच्या संवेदनशील टप्प्यात आपण आहोत. त्यामुळे लोकल वाहतूक, रेल्वे वाहतूक, मेट्रो, लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या, खासगी बस सेवा बंद करण्यात आली आहे. लोकल बस वाहतूक ही केवळ अत्यावश्यक सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी असणार आहे. मुख्यमंत्र्यांनी सर्वांना वर्क फ्रॉम होमचं आवाहनही केले आहे. बंदच्या काळात घरी असणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
 
काय म्हणाले मुख्यमंत्री ?
मध्यरात्रीपासून राज्यात 144 कलम लागू. पाच पेक्षा जास्त लोक एकत्र येऊ शकत नाहीत.
रेल्वे, खासगी बसेस, एसटी बसेस बंद राहणार.
जीवनावश्यक आणि अत्यावश्यक कारणांसाठीच शहरांतर्गत बस सेवा सुरु राहणार
अन्न धान्य, भाजीपाला, औषधे ही दुकाने सुरूच राहतील
बँका, वित्तीय संस्था सुरूच राहणार
शासकीय कार्यालयात आता केवळ पाच टक्के कर्मचारीच उपस्थित राहतील.
मध्यरात्रीपासून सर्व जगातून येणारी विमाने बंद राहणार
ज्यांचं घरीच विलगीकरण केलेले आहे, त्यांच्या हातावर शिक्के आहेत. अशांनी पंधरा दिवस घराबाहेर पडू नका. घरातल्या घरात
सुद्धा वेगळे रहा.
चाचणी केंद्रे आपण वाढवत आहोत.
लॉकडाऊन ३१ मार्चच्या पुढे देखील गरज पडली तर निर्णय घेण्यात येईल.
सर्व प्रार्थनास्थळांवर पूजा सुरु राहील, पण भाविकांसाठी बंद राहणार.
माणुसकी बाळगा. कामगार-तात्पुरत्या आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन द्या.
@@AUTHORINFO_V1@@