आयपीएल २०२०वर लटकतेय कोरोनाची तलवार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Mar-2020
Total Views |

ipl 2020 corona virus_1&n
मुंबई : भारतामध्ये कोरोनाची लागण ७३ जणांना झाली आहे. अजूनही कोरोनाग्रस्तांची चाचपणी सुरूच आहे. अशामध्ये भारतामध्ये आयपीएल २०२० होणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अमेरिकेची बहुप्रतिष्ठित बास्केटबॉल स्पर्धा 'एमबीए' रद्द करण्यात आली. त्यामुळे आयपीएल रद्द होणार, पुढे ढकलणार की काही अटींवर स्पर्धा २९ मार्चपासूनच सुरु यावर बीसीसीआयची १४ मार्चला महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे.
 
 
केंद्र सरकारने गुरुवारी विदेशी खेळाडूंना १५ एप्रिलपर्यंत व्हिसा न देण्याचा निर्णय घेतला. कोरोना व्हायरसच्या धोक्यामुळे ही स्पर्धाच रद्द करण्यासाठी मद्रास उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे. असे असताना देखील बीसीसीआयने मात्र ही स्पर्धा नियोजित वेळेनुसार होणार असे सांगितले आहे. आयपीएलच्या गव्हर्निंग काउंसिलची बैठक येत्या १५ मार्च रोजी होणार आहे. आयपीएल स्पर्धेसंदर्भात या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेतला जाऊ शकतो.
 
 
कोरोनाचा धोका असल्यामुळे स्पर्धा रिकाम्या मैदानात घेण्याचा सल्ला दिला जात आहे. अर्थात यावर बीसीसीआयकडून कोणतेच उत्तर अद्याप आलेले नाही. करोनाचा मुकाबला करण्यासाठी आम्ही सर्व प्रकारच्या उपाय योजना करू, असे बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीने याआधीच सांगितले आहे. तसेच, जर विदेशी खेळाडूंचा समावेश जर आयपीएलमध्ये करण्यात आला नाही तर स्पर्धेला खूप मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@