हाफिज सईद दहशतवाद्यांना अर्थपुरवठा प्रकरणात दोषी ; ५ वर्ष तुरुंगवास

    दिनांक  12-Feb-2020 17:04:25


hafeez saeed_1  
इस्लामाबाद
: मुंबई २६/११ हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि जमात-उद-दवाचा मुख्य सूत्रधार हाफिज सईद याला पाकिस्तानच्या दहशतवाद विरोधी कोर्टाने दहशतवाद्यांना अर्थ पुरवठा केल्याप्रकरणी दोषी मानले. यासह कोर्टाने त्याला ५ वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावली आहे. सईदवर दहशतवादाला रसद पुरविणे, मनी लॉन्ड्रिंग यांसारखे गंभीर २९ गुन्हे दाखल आहेत.


हाफिजच्या विरोधात दहशतवाद्यांना आर्थिक मदत, मनी लाँड्रिंग आणि बेकायदेशीपणे ताबा मिळवणे आदी प्रकरणात २९ गुन्हे दाखल आहेत. मागील वर्षी लाहोरमधील दहशतवादविरोधी कोर्टाने बंदी असलेल्या जमात-उद-दवा या संघटनेचा प्रमुख हाफिज सईदविरोधातील दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याच्या दोन प्रकरणांमध्ये निकाल राखून ठेवला होता. हे खटले दहशतवादविरोधी पथकाच्या लाहोर आणि गुजरावाला शाखेच्यावतीने दाखल करण्यात आले होते.