अभाविपचे राष्ट्रीय मंत्री अनिकेत ओव्हाळ यांचे निधन

    दिनांक  11-Nov-2020 17:13:46
|

Aniket Ovhal_1  
 
 
 
मुंबई : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय मंत्री अनिकेत ओव्हाळ यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. धुळ्याला प्रवासादरम्यान असताना एका नदीत उतरले होते. यावेळी नदीमधील भोवऱ्यामध्ये सापडून त्यांचा मृत्यू झाला. अभाविपने  ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली. गेली अनेक वर्ष ते अभाविपचे पूर्णवेळ कार्यकर्ते म्हणून कार्यरत होते.
 
 
 
 
अनिकेत ओव्हाळ यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले होते. गेली अनेक वर्ष त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या अनेक पदांवर काम केले होते. मुंबई महानगर मंत्री, कोकण प्रदेश मंत्री, अभाविपचे राष्ट्रीय मिडिया सहसंयोजक म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. तसेच, ते अभाविपचे राष्ट्रीय मंत्री म्हणूनदेखील कार्यरत होते. "त्यांच्या अचानक जाण्याने आम्ही एक वचनबद्ध कार्यकर्ता गमावला आहे. देशाने विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी लढणारा एक विद्यार्थी चळवळीचा चेहरा गमावला." असे अभाविपने भावना व्यक्त केल्या आहेत.
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.