“बॉलीवूडपेक्षा अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाकडे लक्ष द्या”

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Oct-2020
Total Views |

Nilesh Rane_1  
 
 
मुंबई : एकीकडे महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी परतीच्या पावसाने शेतकरी बेजार झाला आहे. अशामध्ये शिवसेना आणि राज्य सरकार हे बॉलीवूडच्या समर्थनार्थ भाष्य करत आहेत. अशामध्ये शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ वृत्तपत्रातही याबद्दल लिहिले गेले आहे. “कितीही कोणी कितीही आपटली तरी मुंबईतील बॉलीवूडच्या केसालाही धक्का लागणार नाही” असा इशारा यातून देण्यात आला आहे. यावर भाजप नेते निलेश राणे यांनी “आताची शिवसेना ही बॉलीवूडवाल्यांची केस मोजत बसली आहे” अशी टीका केली आहे.
 
 
 
 
 
शिवसेनेच्या बॉलीवूड संदर्भातील विचारांवर निलेश राणे यांनी आक्षेप घेतला आहे. “आताची शिवसेना बॉलिवूडवाल्यांचे केस मोजत बसली आहे. अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रात प्रचंड नुकसान झाले, लोकांची घरे, गुरे, शेती वाहून गेली. शेतकऱ्यांचे किती नुकसान झाले आहे हे सांगता ही येणार नाही पण, त्यावर अग्रलेख लिहावासा नाही वाटला. यांची मस्ती जिरवलीच पाहिजे.” अशा कठोर शब्दांमध्ये त्यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. गेले काही दिवसांपासून मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात परतीच्या पावसाने हाहाकार माजवला आहे. हजारो शेतकऱ्यांचे यामध्ये नुकसान झाले आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@