नाटकाकडे अभ्यासपूर्ण पध्दतीने पाहण्याचा प्रयत्न व्हावा : डॉ. जब्बार पटेल

    दिनांक  03-Jan-2020 12:45:07
|


asf_1  H x W: 0


मुंबई : "अभ्यासपूर्ण पद्धतीने नाटकाकडे बघण्याचा दृष्टीकोण निर्माण करण्याचा बदल १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या निमित्ताने व्हावा." अशी अपेक्षा १०० व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल यांनी व्यक्त केले. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने नियोजित संमेलनाच्या अध्यक्षांच्या वार्तालापाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बोलताना त्यांनी ही अपेक्षा व्यक्त केली.

 

१०० व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद सन्मानाने मिळल्यानेच आपण ते स्वीकारले. या पदासाठी निवडणूक घेऊन निवडून यायचे असते तर, आपण त्यासाठी नकार दिला असता, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. '१०० वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन कुठेही होऊ देत मात्र, ते नाट्य परिषदेच्या लौकिकाला साजेसे होणार.', अशी अपेक्षा डॉ. पटेल यांनी व्यक्त केली. 'या नाट्य संमेलनाला येणाऱ्या तरुण-तरुणींनी नाट्य संमेलन आवडले अथवा नाही यांपैकी काहीही प्रतिक्रिया दिली तरीही मला चालेल.' असेही त्यांनी सांगितले.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.