नक्षलवाद्यांचा भारत बंद; गडचिरोलीत बॅनरबाजी

    दिनांक  25-Jan-2019


गडचिरोली : भामरागड तालुक्यात लाहेरी मार्गावरील मलमपडूर भागात नक्षलवाद्यांनी बॅनरबाजी केली आहे. येथून काही अंतरावर असलेल्या जुव्वी नाल्याजवळही एक बॅनर लावले आहे. या भागात काही पत्रकेही टाण्यात आली आहेत.

बॅनर आणि पत्रकांच्या माध्यमातून त्यांनी २५ जानेवारी ते ३१ जानेवारीपर्यंत भारत बंदचे आवाहन केले आहे. बॅनर लावलेल्या परिसरातील झाडांची नक्षलवाद्यांनी कत्तल केली आहे. गेल्या आठवड्यात २१ जानेवारीच्या पहाटे नक्षलवाद्यांनी कासनासूर येथील तीन नागरिकांची निर्घृण हत्या केली. त्यानंतर त्यांचे मृतदेह अल्लापल्ली-भामरागड मार्गाव कोसकुंडी फाट्याजवळ फेकून दिले.

 

नक्षवलवाद्यांनी शुक्रवारी पहाटे लाहेरी भामरागड मुख्य मार्गावर असलेल्या मलमपडूर व जुव्वी नाल्याजवळ बॅनर लावले आणि पत्रके टाकून २५ ते ३१ जानेवारीपर्यंत भारत बंदचे आवाहन केले आहे. भामरागड तालुक्यात तणावाचे वातावरण असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/