मिलिंद तेलतुंबडेच्या हत्येचा बदला घेण्याची नक्षलवाद्यांची धमकी

    21-Nov-2021
Total Views |

Teltumbade _1  
 


गडचिरोली
: मिलिंद तेलतुंबडेचा ‘जनयोद्धा’ असा उल्लेख करत नक्षलवाद्यांनी त्याच्या हत्येचा बदला घेणार असल्याची धमकी दिली आहे. गेल्या आठवड्यात गडचिरोली येथे पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत नक्षल कमांडर मिलिंद तेलतुंबडे याच्यासह 26 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. त्यानंतर नक्षलवाद्यांनी मिलिंद तेलतुंबडेचा उल्लेख ’जनयोद्धा’ असे करत त्याच्या हत्येचा बदला घेणार असल्याचे पत्रक जारी केले आहे. तसेच नक्षलवाद्यांकडून सहा राज्यात ‘बंद’चे आवाहन करण्यात आले आहे.