दावोसमध्ये करार केलेल्या 19 प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन

मुख्यमंत्र्यांची मान्यता; राज्यात 3 लाख कोटींची नवीन गुंतवणूक येणार

    26-Mar-2025
Total Views | 11

Special incentives for 19 projects signed in Davos Devendra Fadanvis
मुंबई: ( Special incentives for 19 projects signed in Davos Devendra Fadanvis ) दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्रासोबत सामंजस्य करार केलेल्या एकूण १७ प्रकल्पांना ‘सामूहिक प्रोत्साहन योजने’बरोबरच थ्रस्ट सेक्टर आणि उच्च तंत्रज्ञानावर आधारित धोरणानुसार अतिरिक्त विशेष प्रोत्साहने देण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मान्यता दिली. तसेच अन्य दोन प्रकल्पांना त्यांच्या गुंतवणुकीनुसार अतिविशाल प्रकल्प म्हणून विशेष प्रोत्साहन देण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीत ही मंजुरी देण्यात आली. या १९ सप्रकल्पांमधून 3 लाख, ९२ हजार, ५६ कोटी इतकी नवीन गुंतवणूक राज्यात येणार आहे. त्याद्वारे १ लाख, ११ हजार, ७२५ इतकी प्रत्यक्ष रोजगारनिर्मिती आणि अंदाजे तीन लाख अप्रत्यक्ष रोजगारनिर्मिती होणार आहे. उद्योग विभागातंर्गत विशाल व अतिविशाल प्रकल्पांना ‘सामूहिक प्रोत्साहन योजने’तंर्गत व थ्रस्ट सेक्टरच्या धोरणातंर्गत प्रोत्साहने मंजूर करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली गठित मंत्रिमंडळ उपसमितीची ११ वी बैठक आज विधानभवनातील समिती सभागृहात झाली. या बैठकीला मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री तथा नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार, उद्योगमंत्री उदय सामंत, मुख्य सचिव सुजाता सौनिक उपस्थित होते.
या बैठकीमध्ये एकूण २१ नविषयांवर चर्चा झाली. “थ्रस्ट सेक्टर तथा उच्च तंत्रज्ञानावर आधारित सेमीकंडक्टर चिप्स आणि वेफर्स, इलेक्ट्रिक वाहने, लिथियम आयन बॅटरी, अवकाश व सरंक्षण साहित्यनिर्मिती, हरित स्टील प्रकल्पांसाठी विशेष प्रोत्साहने देण्यासाठीचे प्रस्ताव मंत्रिमंडळ उपसमितीमध्ये विचारात घेण्यात आले. या प्रकल्पांमुळे तांत्रिक नवकल्पना, संशोधन आणि विकासाला चालना मिळून एक मजबूत स्थानिक पुरवठा साखळी विकसित होऊन मराठवाड्यातील सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग घटकांना त्याचा फायदा होणार आहे,” असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
‘द रूट्स ओपन माईक’च्या दोन यशस्वी वर्षांचा सांस्कृतिक उत्सव!

‘द रूट्स ओपन माईक’च्या दोन यशस्वी वर्षांचा सांस्कृतिक उत्सव!

‘संस्कार भारती’ कोकण प्रांताच्या पुढाकारातून सुरु झालेल्या ’THE ROOTS OPEN MIC ’ या उपक्रमाने आपल्या दोन यशस्वी वर्षांची पूर्तता साजरी केली. ‘सा कला या विमुक्तये’ या मूलमंत्रासोबत विविध कलांच्या अभिव्यक्तीसाठी कार्यरत असलेला हा अनोखा उपक्रम. या उपक्रमांतर्गत दर महिन्याच्या तिसर्‍या शनिवारी होणार्‍या कार्यक्रमाच्या यंदाच्या सत्रात मातृदिवस आणि समरसतेसारख्या भावनिक विषयांना वाहिलेली सादरीकरणे करण्यात आली. तसेच दि. 20 मे रोजी येणार्‍या थोर कवी सुमित्रानंदन पंत यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यात ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121