'शीशमहल'प्रकरणी अरविंद केजरीवाल यांची चौकशी होणार!

भाजप मंत्री प्रवेश वर्मा यांनी शीशमहल चौकशीची केली मागणी

    27-Feb-2025
Total Views | 15
 
Sheesh Mahal
 
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणूक नुकतीच पार पडली. त्यानंतर दिल्लीत भाजपने कमळ फुलवले. शीशमहलवरून (Sheesh Mahal) आपचे सर्वेसर्वा आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना घेरण्यात आले होते. दिल्लीच्या निवडणुकीनंतरही शीशमहलचीच चर्चा आहे. भाजपचे मंत्री प्रवेश वर्मा यांनी शीशमहल बांधण्यासाठी केजरीवाल यांनी शासनाचा किती खर्च वापरला? असा प्रश्न उपस्थित केला. त्याच त्याचपार्श्वभूमीवर प्रवेश वर्मा यांनी अरविंद केजरीवाल यांच्या चौकशीची मागणी केली आहे.
 
अरविंद केजरीवाल हे दिल्लीतील फ्लॅगस्टाफ रोड येथे असणाऱ्या बंगल्यात वास्तव्यास होते. त्याला भाजपने शीशमहल असे नाव दिले होते. अरविंद केजरीवाल राहत असलेल्या बंगल्यात काही वस्तुंची केजरीवाल यांनी सार्वजनिक शासनाच्या पैशातूनच ही खरेदी केली असल्याचा दावा भाजपने केला आहे.
 
यावेळी प्रवेश वर्मा यांनी एका प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितले की, ३ वर्षांपूर्वी बांधलेल्या भव्य मुख्यमंत्री कार्यालयाची चौकशी केली जाईल. कोणत्या आधारावर बंगल्याची पुनर्बांधणी केली आणि कोणत्या अधिकाऱ्यांनी त्यांना परवानगी दिली, असा दावा वर्मा यांनी केला आहे. दरम्यान, ५ फेब्रुवारी रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकीत प्रवेश वर्मा यांनी नवी दिल्ली मतदारसंघातून केजरीवाल यांचा पराभव केला होता
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121