अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांच्यावर ईडीची टांगती तलवार, मनी लँड्रिंग प्रकरणात गंभीर आरोप
15-Jan-2025
Total Views | 49
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मद्य घोटाळ्याशी निगडीत मनी लाँड्रिंग प्रकरणामध्ये आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या अडचणीमध्ये वाढ होऊ लागली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदियावर मद्य घोटाळ्याप्रकरणी संबंधित मनी लाँड्रिंगमध्ये सहभागाबद्दल प्रतिबंधक कायद्यांतर्गत खटला चालवण्याची अंमलबजावणी केली आहे. याप्रकरणाचा हवाला एका वृत्तसंस्थेने बुधवारी दिला आहे.
लेफ्टनंट गव्हर्नर विनय कुमार सक्सेना यांनी गेल्या महिन्यातच केजरीवाल यांच्याविरोधात खटला चालवावा असे सांगितले होते. सीबीआयला उत्पादन शुल्क धोरणासंबंधित भ्रष्टाचार प्रकरणामध्ये ऑगस्ट २०२४ मध्ये गतवर्षी केजरीवालांविरोधात मद्य घोटाळ्याप्रकरणी कारवाई करण्यात आली होती.
आरोप पत्रामध्ये या प्रकरणाबाबत दावा करण्यात आला आहे की, मद्य व्यापाऱ्यांकडून घेतलेल्या १०० कोटी रुपये लाचेपैकी ४५ कोटी रुपये आम आदमी पक्षाच्या गोवा निवडणुकीच्या प्रचारासाठी त्याचा वापर करण्यात आला. अरविंद केजरीवाल हे संस्थापक सदस्यांपैकी एक आहेत. मद्य धोरणाबाबत त्यांचा याप्रकरणामध्ये सहभाग होता.
दरम्यान ईडीने आता अरविंद केजरीवाल यांना घोटाळ्याचे किंगपिन म्हटले आहे. केजरीवाल, मनीष सिसोदिया आणि माजी आम आदमी पक्षाचे प्रभारी विजय नायक यांनी त्यांच्या निवडणुकीसाठी १०० कोटींची लाच व्यतिरिक्त अतिरिक्त पैसे मागितल्याचे ईडीने सांगितले आहे.