तेलियामुडा रेल्वे स्थानकावरून पोलिसांनी घेतले ताब्यात
12-Jan-2025
Total Views | 54
त्रिपुरा : आसाम राज्यातील त्रिपुरामध्ये एकूण ८ बांगलादेशी घुसखोरांना सुरक्षा रक्षकांनी अटक करण्यात आली आहे. दोन्ही राज्यांमध्ये चार घुसखोरांना अटक करण्यात आल्याचे वृत्त आहे. त्रिपुरामध्ये घुसखोरांसोबत एका दलालाही पकडण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी घुसखोरांना रेल्वे स्थानकाजवळ पकडण्यात आले असून ते भारतातील इतर भागांमध्ये जाणार होते अशी माहिती आता समोर आली.
आसाममध्ये आंतरराष्ट्रीय सीमेनजीक चार घुसखोरांना पकडण्यात आले असून मुहम्मद सुलेमन, मुहम्मद यासीन, फतिमा खातून आणि सुरा खातून अशी घुसखोरांची नावे आहेत. त्याच्यासोबत दोन लहान मुलांचाही समावेश होता. यावेळी त्यांना अटक करण्यात आली असून आसाम पोलिसांनी त्यांना बांगलादेशात परत पाठवण्यात आले आहे.
संबंधित बांगलादेशी घुसखोऱ्यांना त्रिपुरामध्ये पकडण्यात आले अशी प्राथमिक माहिती आहे. खोवाई जिल्ह्यात त्यांनी घुसखोरी केली. तेलियामुडा रेल्वे स्थानकावरून दुसरीकडे जाण्याचा ते प्रयत्न करत होते. दरम्यान सुरक्षा यंत्रणांना याप्रकरणची मिळताच त्यांना ताब्यात घेतले गेले. पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या असून त्यांना तुरूंगात डांबण्यात आले आहे.