उपमुख्यमंत्री विशेष वैद्यकीय कक्षाची उत्कृष्ट कामगिरी

८ महिन्यात १२ कोटी ७३ लाख रुपयांची आर्थिक मदत

    08-Sep-2024
Total Views | 84

Devendra fadnavis
 
मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील विशेष वैद्यकीय कक्षाने रुग्णसेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांच्या आयुष्यात निरामय आरोग्याचा प्रकाश आणला आहे. गोरगरीब – गरजू रुग्णांना दुर्धर आणि महागड्या शस्त्रक्रियांसाठी उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून थेट अर्थसहाय्य केले जात आहे. यानुसार कक्षाने सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत अवघ्या ८ महिन्यात एकूण १२ कोटी ७३ लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे.
 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी विधि व न्याय विभागाचा कार्यभार घेतल्यानंतर या योजनेची प्रभावी व पारदर्शी अंमलबजावणी करण्याबाबत पाऊले उचलली आहे. त्याचाच भाग म्हणून शासनाच्या दि.३१ ऑक्टोबर २०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये मंत्रालयामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयांतर्गत राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. जानेवारी ते ऑगस्ट २०२४ पर्यंत कक्षाच्या माध्यमातून ३२३ रुग्णांना मदत झाली आहे. हृदय रोग, कर्करोग, यकृत प्रत्यारोपण, मूत्रपिंड प्रत्यारोपण, बोन मॅरो ट्रान्सप्लांट, फुफ्फुसाचे आजार, अस्थिरोग अवयव पुनर्स्थापना शस्त्रक्रीया, यासारख्या गंभीर व सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असलेल्या आजारांच्या शस्त्रक्रीयेंचा समावेश आहे. गोरगरीब रुग्णांना धर्मादाय योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री मदत कक्षाच्यावतीने करण्यात आले आहे.
 
निर्धन व दुर्बल घटकातील रूग्णांना या सवलतीच्या खाटा पारदर्शकपणे उपलब्ध होण्याकरीता राज्यस्तरीय विशेष मदत कक्षासाठी ऑनलाईन प्रणाली विकसीत करण्याचे काम प्रगतीपथावर असून लवकरच सदर प्रणाली सर्वसामान्यांच्या सेवेत कार्यरत होणार आहे. निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांना मदती मिळणे राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्षास अर्जासह कागदपत्रे charityhelp.dcmo@maharashtra.gov.in या ईमेल आयडी वर मेल करु शकतात किंवा प्रत्यक्ष कक्षात आणून देवू शकतात. धर्मादाय रुग्णालयातील बेड मिळण्याकरिता रूग्णास त्याचा, नातेवाईकांचा अर्ज, लोकप्रतिनीधींचे पत्र, आधार कार्ड /ओळखपत्र, रेशनकार्ड/तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला, डॉक्टरांचे प्रिस्क्रीप्शन आवश्यक आहे. राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्ष पूर्ण क्षमतेने कार्यरत योजनेचा लाभ घेण्याकरिता निर्धन व दुर्बल रूग्णांनी लाभ घेण्यात यावा, असे आवाहन कक्षप्रमुख रामेश्वर नाईक यांनी केले आहे.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121