नसीरुद्दीन शाह खऱ्या आयुष्यातही निघाले 'गुलफाम हसन'?

इस्लामोफोबियाच्या उल्लेखानंतर चर्चांना उधाण

    04-Sep-2024
Total Views | 360

Nasiruddin Shah

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Nasiruddin Shah Press Conference)
नेटफ्लिक्सवर नुकतीच 'आयसी-८१४ : कंदहार हायजॅक' वेबसिरीज रिलिज झाली. या वेबसिरीजमुळे अनेक वादविवाद सध्या होताना दिसत आहेत. सोशल मीडियावर उपस्थित होत असलेल्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर या मालिकेतील निर्माता, दिग्दर्शक आणि कलाकारांनी पत्रकार परिषद घेऊन सर्व प्रश्नांवर चर्चा केली. यावेळी ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह हे देखील उप्सथित होते. इस्लामोफोबियाचा उल्लेक करत त्यांनी कंदहार हायजॅक घटनेवर केलेले भाष्य पाहता ते खऱ्या आयुष्यातही 'गुलफाम हसन' निघाले की काय? अशा चर्चा आता होऊ लागल्या आहेत.

हे वाचलंत का? : रामगिरी महाराजांविरोधात ‘सर तन से जुदा’ची हाक देणाऱ्या धर्मांध डॉक्टरला अटक

१९९९ साली झालेल्या 'कंदहार हायजॅक'च्या घटनेबद्दल नसीरुद्दीन शाह यांच्याशी चर्चा झाली तेव्हा त्यांनी अपहरणाची बातमी ऐकल्यानंतर त्यांच्यावर काय परिणाम झाले ते याबाबत त्यांनी सांगितले. ते म्हणाले, “मी त्यावेळी ५० वर्षांचा होतो. मी खूप अस्वस्थ होतो, घाबरलो होतो. कारण मला भीती होती की यामुळे इस्लामोफोबियाची लाट येऊ शकते. सुदैवाने ते तेव्हा घडले नाही. ते कोठे नेले जाईल याचा विचार मी तेव्हा करत होतो."


कोणत्याही धर्माच्या दहशतवाद्यांनी कोणताही गुन्हा केला असेल तर त्याची माहिती देऊन इस्लामोफोबिया कसा पसरेल, असे लोकांचे म्हणणे आहे. याशिवाय, हे देखील सांगण्यासारखे आहे की ज्यावेळी संपूर्ण जग त्या प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रार्थना करत होते, तेव्हा ही व्यक्ती फक्त इस्लामचा विचार करत होती.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121