कोणतीही ताकद ३७० कलम पुनर्स्थापित करू शकत नाही - नरेंद्र मोदी

    19-Sep-2024
Total Views | 41

Narendra Modi
 
श्रीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारास सुरूवात केली आहे. यावेळी बोलत असताना त्यांनी कोणतीही ताकद लावली तरीही ३७० कलम पुनर्स्थापित करू शकणार नाही असे वक्तव्य केले. पाकिस्तानी संरंक्षण मंत्री ख्वाजा यांच्या वक्तव्याचा समाचार घेत राहुल गांधींवर टीकेची तोफ डागली आहे. ते आज १९ सप्टेंबर रोजी जम्मू काश्मीरच्या दौऱ्यासाठी गेले असताना म्हणाले आहेत.
 
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी काश्मीर येथील कलम ३७० पुनर्स्थापित करण्याबाबत वक्तव्य केले होते. जम्मू काश्मीर येथे २५ सप्टेंबर रोजी विधानसभा निवडणूक होणार आहे. यासाठी भाजप एकाबाजूला आणि दुसऱ्या बाजूला नॅशनल कॉन्फरन्ससोबत काँग्रेसची युती आहे. याचपार्श्वभूमीवर आता पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांने कलम ३७० हटवण्यावरून वक्तव्य केले. त्यावर आता मोदी म्हणाले की, यांना कलम ३७० पुन्हा अंमलात आणून देशात दहशतवाद निर्माण करायचा आहे. मात्र कोणतीही ताकद कलम ३७० हटवू शकणार नाही, असे नरेंद्र मोदींना प्रतिपादन केले आहे.
 
शेर-ए-काश्मीर स्टेडियममध्ये प्रचारावेळी पंतप्रधान म्हणाले की, आम्ही देशाच्या संसदेत म्हटले आम्ही जम्मू-काश्मीरला पुन्हा एकदा राज्याचा दर्जा देऊ. २५ सप्टेंबर रोजी सर्वांनी सर्व मतदानाचे विक्रम मोडीत काढण्याचे काम करावे, असे आवाहन मोदींनी केले आहे.
 
दरम्यान, याआधी नरेंद्र मोदींनी १४ सप्टेंबर रोजी नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसबाबत वक्तव्य केले की, या कुटुंबांनी आपली राजकीय दुकाने सुरू केली. हे दुकान चालवण्यासाठी अनेक दशकांपासून जम्मू-काश्मीर येथे द्वेष निर्माण झाला. यामुळे येथील तरूणांची प्रगती झाली नाही. याप्रकरणातील पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काश्मीरचा हा दुसरा दौरा झाला. 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121