बीकेसीतील सात भूखंड एमएमआरडीए भाडेतत्वावर देणार

एमएमआरडीएच्या तिजोरीत ५९४५ कोटी रुपये येणार

    02-Aug-2024
Total Views | 45

MMRD
 
मुंबई : वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी) ७ भूखंड ८० वर्षांच्या भाडेकराराने दिले जाणार आहेत. या ७ भूखंडाच्या भाडेपट्ट्यातून एमएमआरडीएच्या तिजोरीत ५९४५ कोटी रुपये जमा होणार आहेत. नुकत्याच पार पडलेल्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) बैठकीत मान्यता देण्यात आली होती. त्यामुळे या भुखंडांच्या ई - लिलावासाठी आता एमएमआरडीएकडून निविदा मागविण्यात आल्या आहेत.
 
बीकेसीतील भुखंड भाडेतत्वावर देऊन मिळणारा निधी हा एमएमआरडीएच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत आहे. मागील काही वर्षात एमएमआरडीएने मेट्रो, सागरी सेतू, खाडीपुल, उड्डाणपुले आणि रस्त्यांच्या उभारणीचे प्रकल्प मोठे प्रकल्प हाती घेतले आहे. तसेच अनेक प्रकल्प प्रस्तावित आहेत. या प्रकल्पांचा खर्च भागविण्यासाठी एमएमआरडीएला निधीची गरज आहे. परिणामी बीकेसीतील भुखंड भाडेतत्वावर देऊन प्रकल्पांसाठी निधी उभारण्याचा एमएमआरडीएचा प्रयत्न आहे.
 
एमएमआरडीएकडून वाणिज्य वापरासाठी ४ भुखंड, रहिवासी वापरासाठी ३ भुखंड भाडेतत्वावर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जी ब्लॉकमधील हे भुखंड आहेत. यातील वाणिज्य वापराच्या चार भुखंडांचे एकत्रित क्षेत्र २६ हजार ५३४ मीटर आहे. त्यावर कमाल बांधकाम १ लाख ६ हजार चौरस मीटर बांधकाम करता येणार आहे. हे चार भुखंड भाड्याने देऊन एमएमआरडीएला ३ हजार ६५६ कोटी रुपये मिळण्याची आशा आहे.
 
तर रहिवासी वापराच्या तीन भुखंडांचे मिळून एकूण क्षेत्र १६ हजार २५९ चौरस मीटर आहे.त्यावर ६५ हजार ३६ चौरस मीटर एवढे बांधकाम करता येणार आहे. एमएमआरडीएला या तीन भुखंडांच्या लिलावातून २ हजार २८९ कोटी रुपये मिळण्याची आशा आहे. या निविदा कंपन्यांना संयुक्त भागीदारीत भरण्याची मुभा असेल. प्राधिकरणाच्या बैठकीत या भूखंडांच्या लिलावाला मान्यता देण्यात आली आहे.
बीकेसीतील भूखंडांचे कमीत कमी दर
वाणिज्य - ३,४४,५००
रहिवासी - ३,५२,००८
एकूण भुखंड - ७
सात भुखंडांचे क्षेत्रफळ - ४२,७९३ चौरस मीटर
अपेक्षित कमीत कमी उत्पन्न - ५,९४५ कोटी रुपये
 
अग्रलेख
जरुर वाचा
धर्मांतरविरोधी कायदा आणि सध्याचा गोेव्यातील हिंदू समाज

धर्मांतरविरोधी कायदा आणि सध्याचा गोेव्यातील हिंदू समाज

गोवा म्हटले की नजरेसमोर येतात ती फुलांची आरस केलेली देवालये आणि नितांत सुंदर समुद्रकिनारे! मात्र, गेल्या काही वर्षांत हिंदू संस्कृतीच्या सर्व खुणा अभिमानाने मिरवणार्‍या गोव्यामध्ये, धर्मांतरणाच्या द़ृष्टचक्राने वेग घेतला आहे. इस्लामी आणि ख्रिस्ती धर्मांतरणामुळे भविष्यात गोव्यातील हिंदू लोकसंख्या धोक्यात येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळेच धर्मांतरणविरोधी कायद्याची गरज नुकतीच गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली आहे. गोव्यातील धर्मांतरणाच्या या वाढत्या समस्येचा घेतलेला मागोवा.....

शिवदूर्गांचा जागतिक सन्मान: नेतृत्वाच्या प्रयत्नांची गाथा...

शिवदूर्गांचा जागतिक सन्मान: नेतृत्वाच्या प्रयत्नांची गाथा...

‘युनेस्को’ने शिवरायांच्या 12 गडकिल्ल्यांना जागतिक वारशाचा दर्जा नुकताच जाहीर केला. या घोषणेनंतर महाराष्ट्राची मान अभिमानाने पुन्हा एकदा उंचवली. त्याचबरोबर पुन्हा एकदा याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न, काहीजणांकडून जाणीवपूर्वक केला जात आहे. पण, प्रत्यक्षात महाराष्ट्राच्या शिरपेचात आलेल्या या यशाचे खरे मानकरी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आहेत, यात कोणतीही शंका नाही. मुळात या गडकिल्ल्यांना वारसा दर्जा मिळण्याची संपूर्ण प्रक्रिया लक्षात घेतली, तर हे आपल्या नक्कीच लक्षात..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121