अनिल परबांनी योगश कदमांचा राजीनामा घेऊन दाखवावा!

- रामदास कदम यांचे आव्हान; अर्धवट वकील असल्याचा टोला

    25-Jul-2025
Total Views |
 
ramdas-kadam-on-anil-parab
 
रत्नागिरी: माजी मंत्री आणि शिवसेना नेते रामदास कदम यांनी खेड येथील पत्रकार परिषदेत आमदार अनिल परब यांच्यावर टीका करताना त्यांना अर्धवट वकील संबोधले. अनिल परब यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर विधान परिषदेत केलेले आरोप नियमबाह्य असल्याचा दावा करत, त्यांनी योगेश कदम यांचा राजीनामा घेऊन दाखवावा, असे आव्हान कदम यांनी दिले.
 
कदम म्हणाले, “मी ३२ वर्षे विधिमंडळात काम केले आहे. मला सर्व नियम माहिती आहेत. मंत्र्यांवर आरोप करताना नियम ३५ अंतर्गत नोटीस देऊन सभापतींची परवानगी घ्यावी लागते आणि त्याची प्रत आदल्या दिवशी सभापतींना द्यावी लागते. मात्र, परब यांनी योगेश कदम सभागृहात नसताना गुपचूप आणि नियमबाह्य आरोप केले.” त्यांनी परब यांच्यावर दोन दिवसांत हक्कभंग आणण्याचा दावाही केला.
कदम यांनी पुढे सांगितले, “सावली डान्स बार हा योगेश कदम यांच्या मातोश्रींच्या नावावर असल्याचा खोटा आरोप परब आणि उद्धव ठाकरे यांनी केला. आम्ही कधीही डान्स बार चालवले नाहीत किंवा सर्वसामान्यांचे जीवन उध्वस्त केले नाही. योगेश कदम यांना राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न दापोलीत झाला, पण तो अयशस्वी ठरला. उद्धव ठाकरे यांनी खेडमध्ये सभा घेऊनही काही साध्य झाले नाही”, असेही ते म्हणाले. त्यांनी योगेश कदम यांना राज्यातील सर्व डान्स बार बंद करण्याची मोहीम हाती घेण्याचा सल्लाही यावेळी दिला.